https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथील के. के. एम. महाविद्यालयात मासिक पाळी व्यवस्थापन विषयी कार्यशाळा संपन्न

> होमिओपॅथिक तज्ञ डॉ. आशा पवन चांडक यांनी मासिक पाळी व्यवस्थापन विषयी किशोरवयीन मुली व शिक्षकांना केले मार्गदर्शन. एच.ए.आर.सी. संस्थेचा उपक्रम

मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथील पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ शैक्षणिक संकुलाच्या वतीने डॉ. सौ. आशा चांडक यांच्या मार्गदर्शना खाली किशोरवयीन मुलींसाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) तर्फे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नारायण कदम, प्रमुख पाहुणे मानवत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. दिपक दंतुलवार, पोलीस उपनिरीक्षक श्री. गजानन जंत्रे, श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कजेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत शैक्षणिक संकुलातील के. के. एम. महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय, माध्यमिक विद्यालयातील ३५० किशोर वयीन मुली व महिला शिक्षकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीस पोलीस निरीक्षक श्री. दिपक दंतुलवार यांनी महिला विषयक निर्भया पथका विषयी सविस्तर माहिती देऊन, महिला कायदे व चाईल्ड हेल्पलाईन व तक्रार नोंदणी संबधित मार्गदर्शन केले. तर डॉ. आशा चांडक यांनी कार्यशाळेच्या संबंधित माहिती दिली व किशोरवयीन मुलींना ऋतुप्राप्ती झाल्यावर पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक व मानसिक बदल मासिकपाळी व्यवस्थापन, पाळी विषयीचे समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड सुती कापडाच्या घड्याचा वापर, त्याची योग्य विल्हेवाट, पाळीत घ्या वयाचा काळजी योग्य पोषक आहार, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओएस, अतिरक्तस्राव तसेच मासिक पाळीमध्ये वापरण्यासाठी शाश्वत पर्याय अर्थात शोषक म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपस्थित मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन या विषयक माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704