https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आपला जिल्हा

मुंडण आंदोलन,करोडो रुपयाचा बोगस काम

गडचिरोली,प्रतिनिधी :-

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, मुलचेरा या तीन तालुक्यातील करोडो रुपयाचे बोगस काम व काम न करता पैशाची उचल केल्याचे चौकशी अहवालात सिद्ध होऊन २३ अधिकारी व ग्रामसेवक वर अद्याप कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते निळकंठ  संदोकर यांनी मुंडण आंदोलन करुन निषेध केला आहे.  

जिल्हा परिषद, गडचिरोली व जिल्हा प्रशासन यांनी आज आंदोलनास् 16 दिवस पूर्ण झाले तरी पण आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आंदोलनं कार्यकर्ते निळकंठ  संदोकर यांनी मुंडण आंदोलन करुन निषेध केला.यावेळी आंदोलनास सामाजिक कार्यकर्ते, योगाजी कुडवे, निळकंठ संदोकर, रवींद्र सेलोटे, धनंजय डोईजड, चंद्रशेखर सिडाम  उपस्थित होते.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, मुलचेरा या तीन तालुक्यातील करोडो रुपयाचे बोगस काम व काम न करता पैशाची उचल केल्या संदर्भात तक्रार  सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी केली होती. याची गंभीर दखल  मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली यांनी 6 सदस्यीय समिति गठित केली.  चौकशी समितिने प्रत्यक्ष कामावर जाऊन चौकशी केली, त्यानुसार वरील भामरागड, अहेरी, मुलचेरा या तीन पंचायत समितीचे एकूण  २३ अधिकारी व कर्मचारी दोषी आढळलेले आहेत.

भामरागड पंचायत समितीतील गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी,शाखा अभियंता, नरेगा तांत्रिक अधिकारी(tp.o ). व बोटनफुंडी प्रा… पं. सचिव, इरूपडूम्मे ग्रा. पं. सचिव, मडवेली ग्रा. पं. सचिव, मन्नेराजाराम ग्रा. पं. सचिव, येचली ग्रा. पं. सचिव व पल्ली ग्रा. पं. सचिव असे 6 ग्रामसेवक असे एकूण 10 अधिकारी/कर्मचारी दोषी आढळलेले आहेत.

अहेरी पंचायत समितीतील गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, नरेगा तांत्रिक अधिकारी (tpo ), व उमानुर ग्रा. पं. चे ग्रामसेवक असे एकूण 5 अधिकारी/कर्मचारी दोषी आढळलेले आहेत.

मुलचेरा पंचायत समितीतील गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, नरेगा तांत्रिक अधिकारी, (tpo )व विवेकानंदपुर ग्रा. पं. चे सचिव, सुंदरनगर ग्रा. पं. चे सचिव, शांतीग्राम ग्रा. पं चे सचिव, येल्ला ग्रा. पं. चे सचिव, असे एकूण 08 अधिकारी-कर्मचारी दोषी आढळलेले आहेत. असे असतांना आजपर्यन्त यास जबाबदार अधिकारी -कर्मचारी यांचेवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

राज्य शासनाकडून आलेल्या निधीचा दुरुपयोग होत आहे, त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. यास शासन – प्रशासन जबाबदार आहे, दोषी अधिकारी-कर्मचारी यांच्यावर तात्काळ बडतर्फची कार्यवाही करून सर्वांवर फौजदारी गुन्हे नोंद करा. या मागणी करीता दिनांक. 27/03/2023 पासून जिल्हा परिषद कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत ठिय्या धरणा आंदोलन सुरू आहे, आज आंदोलनाचा १६  वा दिवस होता.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704