https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नेताजी सुभाष शिक्षण संस्था, कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा शनिवारी गुणगौरव सोहळा

विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गुणगौरव

मानवत / प्रतिनिधी.

शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या नेताजी सुभाष शिक्षण संस्थाच्या , नेताजी सुभाष कर्मचारी सहकारी संस्थेच्या वतीने विविध शैक्षणिक क्षेत्रात गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळ्याचे आयोजन २१ ऑक्टोबर रोजी पाथरी येथील नेताजी सुभाष विद्यालयात करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांच्या गूणवंत पाल्यांचा गूण गौरव नेताजी सुभाष शिक्षण संस्था, कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने करण्यात येणार असून.
शिक्षक हा समाजाचा आरसा असून तो विविध प्रकारे विद्यार्थ्यांना घडवत असतो त्याच शिक्षकांच्या पाल्याचा ही कुठे तरी गुणगौरव व्हावा याच अनुषंगाने नेताजी सुभाष शिक्षण संस्था , कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित मानवत यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला असून या गुणगौरव सोहळ्यास पालक व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन नेताजी सुभाष कर्मचारी सहकारी पत सस्थेचे अध्यक्ष डी.एस. कौसाईतकर, उपाध्यक्ष के.आर. जोशी, सचिव एस.जी.लाड, सन्माननिय संचालक एन.बी. दिशागत,एस. यू. लाड, एस.एस.नाईक , व्ही.के. सोनवणे , एस. जी. जाधव, बी. आर. कापसे, जी.जी.चव्हाण, ए.एस.हारकळ, ए.एस.चिंचाणे, एन.एल.शिंदे, श्रीमती एस.के.थोरे, श्रीमती एम. डी. पेचफूले , कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704