https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मैत्री ग्रुपच्या वतीने दांडिया गरबा कार्यक्रम मोठ्या उत्सहात संपन्न

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील मैत्री ग्रुपच्या वतीने दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी दांडिया व गरबा कार्यक्रम मोठया उत्सहात दिनांक १७ व १८ ऑक्टोबर रोजी शहरातील नाटकेश्वर मंदिर सभागृहात संपन्न झाला. मानवत शहरातील महिला व युवतींनी या वेळी दांडिया व गरबा खेळण्यास मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या वेळी मुख्य आकर्षण युवतीच्या हातात ढाल व महिलांच्या हातात तलवार घेऊन छत्रपती शिवरायांचे गौरव गीत सादर करून प्रेक्षकांचे मने जिंकली. यावेळी दांडिया व गरबा कार्यक्रमास सहभागी झालेल्या महिलांना व युवतींना लकी ड्रॉ काढून बक्षीस देण्यात आले. या मध्ये माजी नगराध्यक्षा सौ. राणीताई अंकुश लाड यांनी तीन बंपर बक्षीस दिले तर अनेक महिलांनी बक्षीस देऊन आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मैत्री ग्रुपच्या सदस्य सौ. राणी अंकुश लाड, सौ. सुनिताताई झाडगावकर, सौ. सुवर्णाताई महाजन, सौ. मीनाताई देशमुख, सौ. सरोज गुंडू, सौ. ममता चिद्रावार, सौ. लक्ष्मीताई खक्के, सौ. सुषमा गऊल, सौ. सुषमा हिबारे यांच्या सह महिलांनी परिश्रम केले. सदरील कार्यक्रमास मानवत पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांनी चौख बंदोबस्त ठेवला होता तर या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी शहरातील महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704