https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सार्वजनिक रावण दहन कार्यक्रमाची मानवत शहरात जय्यत तयारी

सार्वजनिक रावण दहन कार्यक्रमाचे प्रथम वर्षे

मानवत / प्रतिनिधी.

या वर्षी प्रथमच सार्वजनिक रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील पाळोदी रोड मार्गावरील बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या भव्य मोकळ्या प्रांगणावर *सार्वजनिक रावण दहन.* या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दर वर्षी मानवत शहरात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात असते याच अनुषंगाने २४ ऑक्टोबर रोजी सर्व पक्षीय समितीच्या वतीने सार्वजनिक रावण दहन कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून या आयोजित करण्यात आलेल्या *सार्वजनिक रावण दहन* मैदानाची स्वच्छतेचे उदघाट्न भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्राचार्य मा. अनंत गोलाईत ( गहिलोत ) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख दिपकजी बारहाते , मानवत कॉग्रेस कमीटीचे शहर अध्यक्ष शामभाऊ चव्हाण, अ‍ॅड. विक्रमसिंह दहे, भारतीय जनता पार्टीचे मानवत शहर अध्यक्ष संदीपजी हंचाटे, युवा नेते श्रीकांतजी देशमुख, मानवत कॉग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख बाबासाहेब काळे, यांची या वेळी प्रमूख उपस्थिती होती. *सार्वजनिक रावन दहन* कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे छत्रपती संभाजी नगर येथील नरेशजी राठोड यांचा सुमधुर संगीतमय अर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सुममधुर संगीतमय कार्यक्रमा बरोबर उपस्थित नागरिकांना शूध्द व पौष्टिक मसाला दुधाचे वाटप करण्यात येणार आहे.
तरी या *सार्वजनिक रावण दहन* कार्यक्रमास मानवत शहरासह पंचकोशितील अबाल वृध्द नागरिकांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून या *सार्वजनिक रावण दहन* सोहळ्याचे साक्षीदार व्हा असे आवाहन सार्वजनिक रावण दहन समितीचे संयोजक आयोजक यांनी केले आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704