https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

कौशल्याधिष्ठित शिक्षण काळाची गरज. प्रा. डॉ. संदीप काळे

नांदेड:
शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास उपयोगी पडत नाही. त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो असे प्रतिपादन प्रा. डॉ. संदीप काळे यांनी केले. अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मौजे लिंबगाव येथे आयोजित केलेल्या सात दिवसीय शिबिराच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला सायंकाळच्या सत्रात ते कौशल्य विकास या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मंचावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. के. जे. कांबळे, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संदीप काळे, प्रमुख पाहुण्या प्रा. अश्विनी खांडेकर यांचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणामध्ये पुढे बोलत असताना प्रा. डॉ. संदीप काळे यांनी आजच्या स्पर्धात्मक जगात गुणवत्ता वृद्धिंगत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगुन राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामधूनच माझ्यासारख्या हजारो गुणवंत विद्यार्थ्यांच्या पिढ्या निर्माण करण्याचे काम नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय अविरत पणे करत आहे असे मत व्यक्त केले. माणसाने आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक राहिले पाहिजे त्याशिवाय यशाचे दरवाजे उघडत नाहीत. इंग्रजीमध्ये ‘सॉफ्ट स्कील’ आणि ‘हार्ड स्किल’ असे दोन प्रकार सांगितले जातात. त्यापैकी आपण सॉफ्ट स्कीलचा जीवनात अवलंब केला पाहिजे आणि आपले जीवन समृद्ध केले पाहिजे. जीवनामध्ये माणूस जसा विचार करतो तसाच घडत असतो. त्यामुळे आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी गाळात फसलेल्या हत्तीचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना सकारात्मकतेचे महत्त्व पटवून दिले. अनेक प्रयत्न करूनही गाळात फसलेला हत्ती बाहेर निघत नव्हता शेवटी प्रधानाने राजाला सल्ला दिला की, राजे नगाडे आणून नगाडे वाजवायला प्रारंभ करा जेव्हा नगाड्याचे सूर हत्तीच्या कानात घुमू लागले तेंव्हा हत्तीने सर्व बळ एकवटून शक्ती लावली आणि तो दलदलीतून बाहेर आला. आपल्यामध्येही ईश्वराने अंतरिक शक्ती दिली आहे. तिचे ऐका म्हणजे जीवनात पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. पारंपारिक शिक्षण घेत असताना त्यासोबतच कौशल्याधिष्ठित शिक्षण घेतले तर वाढत्या बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल आणि आपल्या कौशल्याच्या बळावर आपण स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा येणाऱ्या भविष्यामध्ये उदरनिर्वाह करू त्यामुळे कौशल्य शिक्षण घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रा. डॉ. संदीप काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. चंद्रशेखर येंगडे यांनी आपल्या भाषणात आयुष्यामध्ये सकारात्मक विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगुन विद्यार्थ्यांनी सदैव अवचेतन मनाचा विचार न करता चेतन मनाचा विचार करावा असा मौलिक सल्ला दिला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा. के. जे. कांबळे यांनी केला आपल्या अध्यक्षीय समारोपात त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे भूमिका अत्यंत महत्त्वाची असते असे सांगून, विद्यार्थ्यांना शिस्त आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अतिश राठोड व प्रा. डॉ. आशा मेश्राम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक शेख यासेर याने केले तर आभार संभाजी तोटरे यांने केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704