ताज्या घडामोडी
शशिकलाबाई पाईकराव यांचे निधन आज दुपारी २ वाजता नांदेड मध्ये अंत्यसंस्कार

नांदेड, – तथागतनगर येथील ज्येष्ठ नागरिक शशिकलाबाई भीमराव पाईकराव यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७५ वर्षाच्या होत्या. दिवंगत शशिकलाबाई भीमराव पाईकराव यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता नांदेड येथे गोवर्धन घाट स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दीपक भिमराव पाईकराव यांच्या त्या मातोश्री तर अविनाश प्रघाने यांच्या मावशी होत.