रेल्वे प्रश्नासाठी मानवतकरांचा आर्त टाहो रेल्वेप्रश्न मार्गी लावा पालकमंत्र्याकडे समितीची मागणी

मानवत / प्रतिनिधी.
—————————————
२०१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात मानवत रोड ते परळी या रेल्वे मार्गाला मंजूर मिळाली असून या मार्गाचे सर्वे झाले परंतु राज्य सरकारचा प्रस्ताव नसल्याने हा मार्ग रेंगाळला आहे. या मार्गाला मंजुरी प्रस्ताव पाठवून देण्यासाठी निवेदन देण्यात आले.पालकमंत्री यांना दिले निवेदन.
मानवत रोड ते परळी या रेल्वे मार्गाचे सर्वे 2016 मध्ये झाले असून राज्य सरकारच्या वतीने या मार्गाला मंजुरी नसल्याने हा प्रस्ताव रेंगाळला आहे. या रेल्वे मार्गाबाबत राज्य सरकारच्या वतीने मंजुरी प्रस्ताव मंजूर करून तो प्रस्ताव रेल्वे बोर्ड अध्यक्ष व रेल्वेमंत्री यांना पाठविण्यासाठी तसेच 1 एप्रिल 2017 मध्ये राज्याचे परिवहन सचिव मनोज सैनिक यांनी मानवतरोड ते हिंगोली या नवीन रेल्वे मार्गाचा सर्वे करण्यासाठी प्रस्ताव रेल्वेमंत्री यांना पाठविला आहे. मानवत रोड ते परळी आणि मानवत रोड ते हिंगोली या रेल्वे मार्गाच्या कार्याला पाठपुरावा करून कार्याला सुरुवात करण्यासाठी भारतीय जनता पार्टी रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ परभणी जिल्हा कार्यकारिणीच्या च्या वतीने जिल्हा सहसंयोजक के.डी.वर्मा व व महिला जिल्हा सहसंयोजिका
सौ.भारती पोरवाल यांच्यावतीने परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना दीदी बोर्डीकर यांना येथील रेणुका मंगल कार्यालयात मानवत तालुका भाजप कार्यकारिणीच्या वतीने सन्मान व संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या आयोजन प्रसंगी वरील मार्गाबाबत पाठपुरावा करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात दिनांक 11 फेब्रुवारी 2016 रोजी बिहारचे तत्कालीन माजी राज्यपाल व देशाचे माजी राष्ट्रपती माननीय रामनाथजी कोविंद यांना मानवतरोड ते परळी या रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी निवेदन देण्यात आले. दिनांक 19 फेब्रुवारी 2016 रोजी माननीय रेल्वेमंत्री सुरेशजी प्रभू यांना प्रस्ताव पाठवून रामनाथजी कोविंद यांनी शिफारस केली . दिलेल्या निवेदनात 2016 च्या रेल्वे अर्थसंकल्पात माननीय रेल्वेमंत्री सुरेशजी प्रभू यांनी मानवत रोड ते परळी वाया मानवत. पाथरी , सोनपेठ, या रेल्वे मार्गाला मंजुरी देऊन सर्वेक्षण करण्यासाठी दहा लक्ष रुपये मंजूर केले. दक्षिण मध्य रेल्वेचे सिकंदराबादचे मुख्य व्यवस्थापक यांनी मानवत रोड ते परळी या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करून तसा अहवाल दिनांक 11/ 10/ 2018 रोजी रेल्वे मंत्रालयाचे कार्यकारी संचालक नवी दिल्ली यांना प्रस्ताव पाठवला. या रेल्वे मार्गाला महाराष्ट्र सरकारची मंजुरी नसल्याने हा मार्ग रेंगाळला असून या मार्गाचा राज्य सरकारच्या वतीने मंजुरी प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवून देण्यासाठी विनंती करणारे निवेदन परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघनाताई बोर्डिकर यांना देण्यात आले. तसेच दिनांक 4/7/2016 रोजी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडवणीस यांना साई संस्थान पाथरी, मानवत तालुका प्रवासी संघटना, मानवत व्यापारी महासंघ,जिंतूर व्यापारी महासंघ, औंढा नागनाथ देवस्थान, नरसी नामदेव देवस्थान ,हिंगोली व्यापारी महासंघ हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुरकुटे यांच्या वतीने मानवत रोड ते हिंगोली वाया वालूर, पाचलेगाव, जिंतूर, औंढा नागनाथ, नरसी नामदेव, आणि हिंगोली. या नवीन रेल्वे मार्गासाठी के निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक एप्रिल 2017 मध्ये राज्याचे तत्कालीन परिवहन सचिव मनोज सैनिक यांनी मानवत रोड ते हिंगोली या नवीन रेल्वे मार्गासाठीचा प्रस्ताव रेल्वे मंत्राकडे पाठवला आहे त्याबाबतचे पत्र हिंगोली चे भाजप आमदार तानाजीराव मुटकुरे यांना 1 एप्रिल 2017 रोजीच्या पत्राद्वारे कळवले आहे मांडणीवर महोदय अजून 2016 मध्ये मानवतरोड ते परळी या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली त्याबाबतचे सर्वेक्षण झाले. राज्य सरकारच्या वतीने पाठवलेल्या मानवतरोड ते हिंगोली या रेल्वे मार्ग चा पाठपुरावा करण्यासाठी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परळी ते हिंगोली हा मार्ग जवळपास 175 किलोमीटरचा असून या मार्गावर बारा ज्योतिर्लिंग पैकी परळी वैजनाथ व औंढा नागनाथ तसेच वालूर येथील महर्षी वाल्मिक ऋषी यांची तपोभूमी राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांची तपोभूमी पाचलेगाव जिंतूर हे तालुक्याचे शहर व जैन धर्मियांचे पवित्र स्थळ नेमगिरी संस्थान तसेच औंढा नागनाथ संस्थान राष्ट्रसंत नामदेव महाराज जन्मस्थळ नरसी नामदेव हिंगोली जिल्ह्याचे ठिकाण मध्ये इथून पुढे रेल्वे मार्गाने विदर्भाकडे जाता येईल तसेच परळीतून दक्षिण भारतात जाता येईल या परळी ते हिंगोली वाया मानवत रोड या रेल्वे मार्गाच्या कार्या बाबत पाठपुरावा करावा असे निवेदनात म्हटले आहे.
दिलेल्या निवेदनात भारतीय जनता पार्टी रेल्वे प्रवासी प्रकोष्ट परभणी जिल्हा संयोजक विजय मंत्री.सहसंयोजक के.डी.वर्मा, जिल्हा सहसंयोजिका सौ. भारती पोरवाल, व डॉ.कीर्ती मुंदडा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
***