एनसीसी कक्षाची कामगिरी आणि योगदान प्रशंसनीय – प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे

नांदेड:( दि.१३ जून २०२५)
यशवंत महाविद्यालयातील एनसीसी कक्षामध्ये विद्यार्थिनींचे युनिट असून महाविद्यालयासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. या कक्षाचे कार्य, योगदान आणि कामगिरी प्रशंसनीय असून एनसीसी कॅडेट्सनी दहा दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडले. या कॅडेट्सना फायरिंग, ड्रिल, गार्ड ऑफ ऑनर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पारितोषिक प्राप्त झाले; ही कौतुकास्पद बाब आहे. इतकेच नव्हे तर एनसीसी मधील अनेक कॅडेट्सनी भारतीय सेनेत विविध पदे प्राप्त करून रोजगार देखील मिळविलेला आहे, असे प्रतिपादन माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी केले.
बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयात यशवंत महाविद्यालयातील प्रशिक्षित यशस्वीत्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
कम्बाईन वार्षिक प्रशिक्षण शिबिर:२०९ मध्ये परभणी, नांदेड आणि हिंगोली येथील ४५० कॅडेट्सनी सहभाग घेतला होता.
या सत्कार सोहळाप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, एनसीसी कक्षाचे संचालक लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर, लेफ्टनंट डॉ.रामराज गावंडे, जीसीआय प्रा.प्रियांका सिसोदिया, प्रबंधक संदीप पाटील, डॉ.अजय गव्हाणे, अधीक्षक कालिदास बिरादार आणि गजानन पाटील यांची उपस्थिती होती.