ताज्या घडामोडी

माझी वसूंधरा* अभियाना अंर्तगत पर्यावरण संवर्धनासाठी मानवत नगर परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम.

मानवत / प्रतिनिधी.
——————————————

मानवत नगर परिषद मानवतच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम
माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत नगरपरिषद मानवत तर्फे पर्यावरण संवर्धनासाठी वेग वेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. आज मुख्याधिकारीश्रीमती कोमल सावरे यांच्या उपस्थितीत मानवत नगर परिषद तर्फे कार्यालयाची १०००० रोपाची नर्सरी तयार करण्यात आली. यावेळी विविध प्रकारचे झाडे रोपे लावण्यात आली आहेत. यामध्ये गोलमोहर, रिटा , बेलपत्र,लिंब,करंज, साधी चिंच,शम्मी, शेमल, इत्यादी रोपांचा समावेश आहे. यावेळी बोलताना मुख्याधिकारी श्रीमती. सावरे यांनी नागरिकांना माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत *”हर घर नर्सरी अभियान ” मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केली आहे की, शहरातील प्रत्येक कुटुंबाने व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने या उपक्रमात सहभागी होऊन प्रशासनास सहकार्य करावे. आपण आपल्या घरामध्ये विविध जातीचे किमान किमान ५० रोपे लाऊन नर्सरी तयार करून रोपाचे संगोपन करावे.
हर घर नर्सरी अभियान मध्ये श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत व इतर कर्मचारी यामध्ये श्री सय्यद अन्वर, नगर अभियंता,, लेखापाल, श्री महेश कदम लेखापाल,श्री प्रकाश हरकळ, श्री भगवानराव शिंदे, श्री रामराव चव्हाण, श्री भारत पवार, ,श्री शतानिक जोशी, श्री संतोष खरात, श्री. अजय उडते, श्री भागवत भोसले, श्री बळीराम दहे ,श्री संजय रुद्रवार, श्री दीपक सातभाई, श्री मनमोहन बारहाते, श्री भगवानराव बारटक्के, श्री रवि दहे, श्री पंकज पवार,श्री सचिन सोनवणे, श्री शिवाजी कच्छवे,श्री नारायण व्यवहारे, श्रीमती वंदना इंगोले, श्री मुंजाभाऊ डोळसे, श्री सोनाजी काळे, श्री नारायण काळे, श्री.संजय कुऱ्हाडे, श्री अलीम, श्री जावेद मिर, श्री निवृत्ती लाड, श्रीमती सुनीता वाडकर, भारती भदर्गे, श्री सुनील कीर्तने, श्री दीपक भदर्गे,. याचबरोबर स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षक श्री मुंजाभाऊ गवारे, व श्री वसीम शेख व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.