ताज्या घडामोडी

*अ.भा.सोनार समाज महाअधिवेशनाच्या नियोजनाची बैठक संपन्न

MCR NEWS / ANIL CHAVAN
————————————

परभणी येथे सोनार सेवा महासंघ (महाराष्ट्र राज्य) आयोजित सोनार समाज महाअधिवेशनाच्या अनुषंगाने नियोजन बैठक सोनार सेवा महासंघ महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सर्वप्रथम संत शिरोमणी श्री संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीस सुरुवात केली.
यावेळी सर्व मान्यवरांनी होणाऱ्या अखिल भारतीय सोनार समाजाच्या महा अधिवेशनास पूर्ण पाठिंबा दिला व एक मुखाने सहमती दिली. यावेळी महासंघाचे कार्याध्यक्ष रमेशराव शहाणे, सराफ – सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष सुधाकरराव धानोरकर, मधुकरराव धानोरकर, सुरेश टाक(परळी), परभणी सराफ असोसिएशनचे सचिन अंबिलवादे, ग्रामीण सोनार संघटनेचे गोविंद अंबिलवादे, अरुण कुलथे , भगवानराव शहाणे, शाहू कुलथे , लक्ष्मीकांत लोलगे, दीपकराव झरीकर, अशोक डहाळे आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत टाक यांनी केले. यावेळी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी होणाऱ्या महाधिवेशनास पाठिंबा दर्शविला.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.