सोनू दरेगावकर यांच्या जगणं दुनियादारीचं या पुस्तकाचे लंडनमध्ये प्रकाशन.

नांदेड प्रतिनिधी;
आंतरराष्ट्रीय परिषद डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे जागतिक दृष्टिकोन: न्याय, समानता आणि लोकशाहीची पुनर्कल्पना दिनांक: २४ आणि २५ एप्रिल, २०२५ महाराष्ट्र सरकारचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था-पुणे, मुंबई विद्यापीठ, एसओएएस आंबेडकर सोसायटी आणि द ऑनररेबल सोसायटी ऑफ ग्रेज इन-यूके डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे जागतिक दृष्टिकोन: न्याय, समानता आणि लोकशाहीची पुनर्कल्पना या विषयावर संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
आयोजित कार्यक्रमात, स्वयंदीप प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले युवा साहित्यिक तथा सुप्रसिद्ध निवेदक सोनू दरेगावकर,
नांदेड लिखित, जगणं दुनियादारीचं या मराठी पुस्तकाचे दिनांक: २४ एप्रिल २०२५ रोजी. जागतिक पातळीवर स्थळ: स्थळ: ग्रेज इन, ८ साउथ स्क्वेअर, यूके लंडन येथे प्राचार्य डॉ. बळीराम नामदेवराव गायकवाड संचालक, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, मुंबई विद्यापीठ, माजी कुलसचिव मुंबई विद्यापीठ यांच्या पुढाकाराने जगणं दुनियादारीचं या मराठी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी,
प्राचार्य, गंजेवार सर, प्रा. डॉ. बळीराम गायकवाड सर, प्रा. ऑस्टिन डुनो- यूके, मा. केलविन गेरी यूके, मा. लिव्हिया पिकाडं यूके, प्रा. जी. एस. चव्हाण, मा. साक्षी लगडे यांनी उपस्थित होते.