ताज्या घडामोडी

अभिषेक दाढेल दिग्दर्शित द मिस्ड पेज या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय स्तरावरील सहा पुरस्कार

…….
नांदेड: अभिषेक भारत दाढेल दिग्दर्शित द मिस्ड पेज या शॉर्ट फिल्म ला आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील सहा अवार्ड प्राप्त झाले आहेत.
या लघू चित्रपटातील तरुणी ही आभासी जगात वावरत एका अनोळखी तरुणाच्या मैत्रीत सहजपणे गुंतत जाते. त्या अनोळखी तरुणावर विश्वास ठेऊन त्याला आपले मानून ती भविष्यातील जोडीदाराचा शोध घेत असते. परंतु ते तेवढे सोपे नसते आणि मग तिथेच ती फसते… वर्तमानपत्रात येणारे पत्रके सुद्धा किती महत्त्वाचे असतात आणि ते नजरचुकीने न वाचल्यामुळे काय घडते… हे या लघु चित्रपटात पाहण्यास मिळते.
विषय तसेच त्यातील कलावंतांनी केलेला अभिनय,पार्श्वसंगीत, चित्रीकरण संकलन दर्जेदार झाले आहे. त्यामुळे हा लघु चित्रपट पाहताना त्यातील संदेश मनाला भिडतो.
अवघ्या दोन दिवसात या चित्रपटाची निर्मिती व लेखन अभिषेक दाढेल यांनी केले.कमी वयात समाज वास्तवाचे भान घेऊन या तरुण कलावंताने नवपिढीला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. अभिषेक दाढेल व संचिता पाल यांचा सहज अभिनय पाहणाऱ्यांना खेळऊन ठेवतो.
आतापर्यंत या चित्रपटाला सहा अवार्ड प्राप्त झाले आहेत. यामध्ये क्रीसिंडो, पुणे – सेकंड अवार्ड,
मीनिर्वा, पुणे – फर्स्ट अवार्ड, क्रिप्टेरा ,कोईमतुर फर्स्ट अवार्ड
आयआयएम,इंदोर , थर्ड अवार्ड
नालसार, हैदराबाद,थर्ड अवार्ड
सिम्बॉयसिस लॉ स्कूल, पुणे फर्स्ट अवार्ड या पुरस्काराचा समावेश आहे.
या यशाबद्दल रामेश्वर भालेराव ज्युनिअर जॉनी लिव्हर, शाहीर रमेश गिरी, दिनेश कवडे, डॉ. ज्ञानेश्वर गाडे, डॉ. राम वाघमारे, शिवा कांबळे, श्रीनिवास भोसले, हनुमान चंदेल, सतीश मोहिते, प्राचार्य गणेश जोशी, डॉ. प्रवीण कुमार शेलुकर, डॉ. भगवान सूर्यवंशी, प्रा. शरद वाघमारे, रेणुका गुप्ता,प्रशांत कराळे, गुलजार ठाकूर, सतीश वाघरे, बालाजी ढगे, डॉ. शंकर विभुते, डॉ. देविदास तारू, महेश मोरे, डॉ. डब्ल्यू. एच. शेख, प्रा. डी. आर. पवार आदींनी स्वागत केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.