प्रतिभा निकेतन महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रम साजरा
नांदेड: येथील प्रतिभा निकेतन महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमाचा भाग म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर यांनी नवीन वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना दैनिक उद्याचा मराठवाडाचा दिवाळी अंक भेट देऊन सर्वांना नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ.गंगाखेडकर यांनी सोशल मिडियाच्या वाढत्या प्रभावाच्या काळात विद्यार्थी व अध्यापकांचे सकस वाचनाकडे दुर्लक्ष होत असून त्याचा परिणाम वाचनसंस्कृतीवर होत असल्याचे सांगितले. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे ग्रंथ प्रदर्शनाकडे कशी पाठ फिरवली जात आहे याकडेही त्यांनी लक्ष्य वेधले.
या अंकाविषयी बोलताना महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.रवींद्र लाठकर यांनी असे आवाहन केले की,सदरील अंकात महाराष्ट्रातील नामांकित व्यक्तिमत्त्वावर चरित्रपर लेख असल्यामुळे या अंकाचे सर्वांनी अवश्य वाचन करावे.
याप्रसंगी कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. दिलीप स्वामी,स्टाफ सेक्रेटरी डॉ.पी.निळकंठराव,कार्यालयीन अधिक्षक श्री.राजेश अय्यंगार,प्रा. डॉ. संजय हापगुंडे, प्रा.डॉ. श्रीमंत राऊत, प्रा.डॉ.आर.डी.वरवंटीकर, प्रा.डॉ.मारोती लुटे, प्रा.डॉ.दीपक वाघमारे, प्रा.डॉ.जयश्री देशमुख, प्रा.डॉ.ममता मालविया, प्रा.डॉ. स्वाती तांडे, प्रा. डॉ.जी.टी. वाघमारे,प्रा. डॉ. प्रवीणकुमार सावंत, प्रा डॉ. चंद्रकांत गजभारे, प्रा.नंदकिशोर गायकवाड, प्रा.डॉ बाबू गिरी, प्रा.डॉ. राजेश चालीकवार,प्रा.डॉ पराग साले, प्रा.प्रवीण स्वामी, प्रा.डॉ. जीवन चव्हाण, प्रा. डॉ.राजेश कुंटुरकर, प्रा.हंसराज आठवले,प्रा. सम्राट कांबळे, प्रा. राजेश टेपावार, प्रा.डॉ. मेघा पाठक,प्रा. डॉ.ममता देशमुख,प्रा.संगीता भुसारे,प्रा.रवी चव्हाण,प्रा.डॉ. किर्तीमालिनी पाटील, प्रा.डॉ.सपना पाटील,प्रा.अनुजा आंबटवाड,प्रा.श्यामराज भालेराव,श्री.उन्मेष चालीकवार,श्री. संजय हजारे,श्री.अजय पवार यांची उपस्थिती होती.