ताज्या घडामोडी

वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत ‘यशवंत ‘ मध्ये ग्रंथ प्रदर्शन उत्साहात संपन्न

नांदेड:( दि.३ जानेवारी २०२५)
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अधिपत्याखालील विद्यापीठे, महाविद्यालय व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम प्रत्येक वर्षी दि.१ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत राबविण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व वाढविण्यासाठी शासन निर्णयानुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचनांना अनुसरून वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम व अन्य अभिनव उपक्रम राबविण्याबाबत आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना निर्देशित करण्यात आल्या आहेत.


त्यास अनुसरून यशवंत महाविदयालय ग्रंथालय व वाचन संकल्प महाराष्ट्राचा महाविद्यालय समिती यांचे संयुक्त विद्यमाने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” प्रेरणा पंधरवड्याच्या निमित्ताने दि.१ व २ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायं. ०५ वाजेपर्यंत ग्रंथालय सभागृहामध्ये “शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत ग्रंथालयात दाखल नवीन ग्रंथ” या विषयावरील ग्रंथ प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटक विद्यमान प्राचार्य तथा माजी प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते.
उद्घाटनप्रसंगी त्यांनी, महाविद्यालय ग्रंथालयामार्फत सर्व ग्रंथसंग्रह व वाचनसाहित्य याची सोयीसुविधा विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध आहे. त्याचा शैक्षणिक विकास व स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळविण्यासाठी पुरेपूर उपयोग करून फायदा घ्यावा. याच बरोबरीने ग्रंथालय वाचन कक्ष व ई-संसाधने (ई-रिसोर्सेस) याचाही जास्तीत जास्त उपयोग करून विविध वाचन साहित्य वाचावे. मोबाईलवर येणाऱ्या वाचन साहित्याबरोबर ग्रंथालयात उपलब्ध साहित्याचाही पुरेपूर उपयोग करून घ्यावा.
प्रारंभी समन्वयक ग्रंथपाल डॉ. कैलास ना. वडजे यांनी प्रास्ताविकाद्वारे कार्यक्रमाचा उद्देश विषद केला.
मराठी विभागप्रमुख डॉ. संजय जगताप यांनी, “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उद्देश विस्तृतपणे सांगून वाचनाचे विद्यार्थी जीवनात महत्व कसे आहे, यावर मार्गदर्शन केले. समिती सदस्य डॉ. पद्माराणी राव (इंग्रजी विभाग), डॉ. संदीप पाईकराव (हिंदी विभाग), डॉ. शबाना दुर्रानी (उर्दू विभाग), डॉ. अजय गव्हाणे (माहिती व प्रसिद्धी प्रमुख), प्रा. राजश्री भोपाळे (राष्ट्रीय सेवा योजना), तसेच डॉ. शिवराज बोकडे (इतिहास विभाग प्रमुख), डॉ. साईनाथ शाहू व महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
ग्रंथ प्रदर्शनात विद्यार्थ्यांना, शिक्षकांना उपयुक्त असे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये नव्याने खरेदी केलेले व भेटीदाखल प्राप्त वाचन साहित्य विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे ग्रंथसंग्रह, ई-वाचनसाहित्य, नियतकालिके, संशोधन पत्रिका व अहवाल इत्यादी मांडण्यात आलेले होते.
ग्रंथ प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या ग्रंथांचा लाभ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनीं, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घेतला आहे.
सदरील ग्रंथ प्रदर्शनात ग्रंथ मांडणीसाठी सहायक ग्रंथपाल श्री.संजय भोळे, श्रीमती पिंपळपल्ले, श्री. देशमुख, श्री.मोरे, व तसेच सर्व ग्रंथालय कर्मचारीवृंद श्री.धात्रक, तोगरे, गोरटकर, सिराज, साखरे, अलुरवाड, श्रीमती विटाळकर व श्रीमती कुकुटला यांनी परिश्रम घेतले तसेच या ग्रंथ प्रदर्शनास महाविद्यालय व परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक व नागरिकांनी भेट देऊन ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला.
ग्रंथ प्रदर्शनाची सांगता सहायक ग्रंथपाल श्री.संजय भोळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.