सावित्रीबाई फुले सारखे….ना कोणी होणे..

सावित्रीबाईंसारखा गेटअप करणं सोपं असेलही पण सावित्री होऊन पदरात निखारे बांधणं… म्हणावं तितकं सोपं नाही. कपाळावरच्या आडव्या कुंकवासारखं थोथांड जपणाऱ्या व्यवस्थेला आडवं करण्याची ताकत पाहिजे त्यासाठी!
थोर समाजसेवक महात्मा जोतिराव फुले यांची पत्नी सावित्रीबाई. नावाप्रमाणं पतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी स्त्री ! आपल्या देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातले हे एक आगळं वेगळं जोडपं वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचा जोतीबाशी विवाह झाला.
जोतिबा त्यावेळी अवघे १३ वर्षाचे होते. साल १८४०, स्रियांनी शाळेत जाण मान्य नव्हतं; कर्मठ समाजाला. अशात जोतिबानी धारिष्टकेलं. सावित्रीबाईंना घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली. सावित्रीबाईंची देखील त्याना उत्तम साथ लाभली.
त्यांनी “टाकलेलं पाऊलं” हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सामाजिक जीवनाची खरी खुरी सुरुवात म्हणायची !
सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळेच आणि सोसलेल्या कष्टामुळेच स्त्री आज संस्कृती-संवर्धनाचे कार्य मोठ्या हिमतीने करीत आहे. स्त्रीचे कर्तृत्वक्षेत्र फक्त स्वयंपाकघरापुरतेच मर्यादित नाही. आज स्त्री नोकरी करायला, घरासाठी कमवायला बाहेर पडते, पुरुषांना अर्थार्जनात हातभार लावते. अनेक क्षेत्रांमध्ये आज स्वता:चे कर्तृत्व गाजवीत आहे. तर दुसरीकडे केवळ पुरुषांची बरोबरी करायची या उद्देशाने स्त्रियांनी हव्यास करण्यापेक्षा आपली बलस्थाने ओळखावीत.
फक्त आणि फक्त यशस्वी होण्यासाठी वेगळी धडपड करू नये.
आजकाल स्त्रियांच्या हातात बऱ्यापैकी पैसा खेळत असल्यामुळे खर्चिक वृत्ती वाढीस लागली आहे. आपण सण साजरे करतो आहेत फक्त फॅशन म्हणून! त्यामागे ही उत्सवीपणा वाढला आहे, चंगळवाद वाढत आहे, संपत्तीची उधळपट्टी वाढत आहे. पण आपण परंपरेतील सौंदर्याचा आस्वाद घ्यायला विसरत आहोत.
धर्म ही अशीच एक आपल्या जीवनाला घट्ट चिकटलेली गोष्ट आहे याचाच उहापोह करतं आजकाल तर काहीजणी जाती-धर्माच्या नावाखाली, धार्मिक उपक्रम करण्यात कृतज्ञता मानत आहे.
सावित्रीबाई फुले यांनी“ देशातल्या हजारो वर्षातल्या धार्मिक परंपरा नाकारुन त्या विरोधात विधायक विद्रोह केला होता.
‘सावित्री- बाईंचा पोषाख सुद्धा जोतिबारावांसारखा अगदी साधा. गळ्यात एक पोत मंगळसूत्र, कपाळावर कुंकू. अगदी साधी साडी. अन्य कोणताही अलंकार अंगावर नसायचा. ‘
“साधी राहणी नि उच्च विचारसरणी ‘ असावी हे या फुले दांपत्यान. जणू आपल्या वर्तनातून समाजाला सिद्धू क्ररुन दाखवलं !
जोतिबा फुले यांच्या नंतरही त्यांनी पतीचं कार्य नेटानं पुढे नेण्यात यश संपादन केलं. पण प्लेगच्या साथीत लोकांना बाचवता-वाचवता प्लेगची लागण होऊन ही कर्तृत्ववान स्त्री जोतिरावांच्या भेटीला गेली… चिरंतर झाली.
सावित्रीबाई फुले यांच्या सारखे दुसरे कोणी ही होणे नाही.
अश्या शैक्षणिक आणि सामाजिक भिंतीची चौकट ओलांडून त्याग , समर्पणाचा इतिहास लिहिणार्या, स्त्रियांच्या भाग्यविधातेस कोटी कोटी प्रणाम!
रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211