भारताचा जीपीएस हे भारताचे संविधान आहे -डॉ.श्रीरंजन आवटे

नांदेड:( दि.१ फेब्रुवारी २०२५)
भारतीय संविधानाचा इतिहास अभ्यासल्यानंतर संविधानाचे वेगळेपण लक्षात येते. आपण कोण आहोत, हे संविधान सांगते. भारतीय संविधान हे आपले आयकार्ड आहे. देशाचा जीपीएस हे भारताचे संविधान आहे; असे प्रतिपादन पत्रकार, स्तंभलेखक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ.श्रीरंजन आवटे यांनी केले.
यशवंत महाविद्यालयात पीएम: उषा: सॉफ्ट कंपोनंट ऍक्टिव्हिटी अंतर्गत माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यशास्त्र विभागाद्वारे आयोजित ‘भारताचे संविधान: आपलं आयकार्ड’ या विषयावरील विशेष अतिथी व्याख्यानमालेत ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर अध्यक्षा उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.वीरभद्र स्वामी, नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे डॉ.महेश पाटील यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे यांनी, भारतीय असणे म्हणजे परमतसहिष्णु, अहिंसावादी व समतावादी असणे होय. सत्ता, संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा यांचे समान पद्धतीने वाटप झाले पाहिजे. लोकांमध्ये वैचारिक साक्षरता आणि सुसंस्कृतता निर्माण झाल्यानंतर आपण संविधानिक मार्गाने जाऊ शकतो, असे मत व्यक्त केले.
पुढे बोलताना डॉ.श्रीरंजन आवटे म्हणाले की, भारतीय संविधानाने आपले सर्वांचे जीवन अनलॉक केले आहे. आपल्या स्वप्नांचा आवाज म्हणजे संविधान होय. द्वेष ही आपली जीवनशैली असू शकत नाही. भारतीय संविधान हा मानवता, आपुलकी आणि प्रेमाचा ग्रंथ आहे.
प्रश्नोत्तर चर्चासत्रात कु. शर्मीन शेख, नितीन सोनकांबळे आणि कृष्णा वाघमारे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
व्याख्यानाचा प्रारंभ कु.अदिती भालेराव यांच्याद्वारे सामूहिक संविधान उद्देशपत्रिका वाचनाने झाला. प्रास्ताविक डॉ. अजय गव्हाणे यांनी केले. सूत्रसंचालन विनोद कोलते, प्रमुख अतिथींचा परिचय विष्णु पिन्नलवार तर शेवटी आभार डॉ.वीरभद्र स्वामी यांनी मानले.
याप्रसंगी उत्तम भगत, काशिनाथ इसादकर, प्रा.पूजा उपरे, डॉ. साईनाथ शाहू, डॉ.शिवराज बोकडे, डॉ. साईनाथ बिंदगे, डॉ.राजरत्न सोनटक्के, डॉ.आत्माराम जाधव आणि विद्यार्थी विद्यार्थिनींची बहुसंख्येने उपस्थिती होती.
व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ.एम.एम. व्ही. बेग, डॉ.शिवदास शिंदे, प्रबंधक संदीप पाटील, डॉ.प्रवीणकुमार सेलूकर, लेखापाल अभय थेटे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे, गणेश विनकरे, योगेश केकाने, नितीन सोनकांबळे आदींनी सहकार्य केले.