जय हिंद च्या सांस्कृतिक महोत्सव 2025 ची उत्स्फूर्तपणे सुरुवात

उदगीर :-येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये
शै.वर्ष 2024-25 च्या वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक महोत्सव 2025 ची उत्स्फूर्तपणे सुरुवात झाली.या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन श्यामलाल मेमोरियल माध्यमिक विद्यालय उदगीर येथील सेवानिवृत्त शिक्षक पटणे गुंडप्पा अमृतराव यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर फिटनेस ट्रेनर आलिम सर, संस्थेचे एच. आर. मॅनेजर अनिश जेठ्ठी, जय हिंद पब्लिक स्कूलचे प्राचार्य संजय हट्टे, जय हिंद ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या मनोरमा शास्त्री, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गणेश तोलसरवाड, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ज्योती तारे, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ पवार, फ्लोरेनस नर्सिंग कॉलेज लातूर चे प्राचार्य नागसेन तारे, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव, उपप्राचार्य सतीश वाघमारे, महेश हुलसुरे, सविता बिरादार, राहुल कल्लुरकर, काकासाहेब सूर्यवंशी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
सदरील सांस्कृतिक महोत्सव हा 01 फेब्रुवारी ते 03 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे. या सांस्कृतीक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध देशपर, आदिवासी, भक्तीगीत, बॉलीवूड गीत यावर नृत्य सादर करीत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. तर दि.02 फेब्रुवारीला महाभारत ( महानाट्य ), व 03 फेब्रुवारी रोजी भागवत गीता ( महानाट्य ) विद्यार्थ्याकडून सादर केली जाणार आहेत.
हा सांस्कृतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शाळा व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.