ताज्या घडामोडी
डॉ. सुप्रिया अमित पेडगावकर लिखित स्त्री आरोग्य पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

नांदेड: नांदेड येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ सुप्रिया अमित पेडगावकर लिखित स्त्रियांच्या आरोग्याच्या अनेक छोट्या मोठ्या आजाराची अत्यंत सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन उद्या दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रविवार रोजी डॉ. वैशाली किन्हाळकर यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता नरवाडे मंगल कार्यालय पूर्णा रोड नांदेड येथे संपन्न होणार आहे,
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व मार्गदर्शक डॉ. ए. आर. महाले डॉ. किशोर आतनूरकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार डोईफोडे आयुक्त व प्रशासक नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हे उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन डॉ. अमित ईश्वर पेडगावकर चंद्रकांत रामजी पंडित यांनी केली आहे.