ताज्या घडामोडी

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड परिसर ची कार्यकारिणी घोषित*

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड परिसर च्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. सुहास पाठक*

*

*
नांदेड: राष्ट्र के हित मे शिक्षा, शिक्षा के हित मे शिक्षक, शिक्षक के हित मे समाज या उक्ती प्रमाणे कार्य करणाऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विभागाची बैठक महामंत्री प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या प्रसंगी प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी अ. भा. रा. शै. महासंघची कार्य प्रणाली, तत्व, भूमिका सर्वांना विषद करून सांगितली. या बैठकीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कार्यकारिणीची घोषणा प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी केली. अध्यक्ष पदी प्रा. डॉ. सुहास पाठक, उपाध्यक्ष डॉ. राजेश शिंदे, संचालक उपकेंद्र लातूर, उपाध्यक्ष प्रा. डॉ. बाबासाहेब सुरवसे, महामंत्री प्रा. डॉ. कृष्णा चैतन्य, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. रणजितसिंह तेहरा, संघटक प्रा. डॉ. शैलेश वाढेर, प्रसिध्दी प्रमुख डॉ. संगीता माकोने, महिला प्रमुख प्रा. डॉ. योगिनी सातारकर, सदस्य प्रा. डॉ. योगेश लोलगे, प्रा. डॉ. काशिनाथ भोगले, प्रा. डॉ. प्रमोद लोणारकर, प्रा. डॉ. अनिकेत मुळे, प्रा. डॉ. जिशान अली, प्रा. डॉ. सतीश मेकेवाड यांची निवड करण्यात आली.
या निवडी बद्दल नांदेड विभाग अध्यक्ष प्राचार्य डॉ. दीपक बच्चेवार, विभाग महिला प्रतिनिधी प्रा. डॉ. वर्षा दोडिया, प्रांत उपाध्यक्ष डॉ. संतराम मुंढे, राष्ट्रीय सचिव तथा प्रांत अध्यक्ष प्रा. डॉ. प्रदिप खेडकर, प्रांत सहमंत्री डॉ. दिनेश खेडकर, डॉ. रुपेंद्रकुमार गौर, प्रांत महामंत्री डॉ. वैभव नरवडे, पश्चिम क्षेत्र प्रमुख डॉ. शेखर चंद्रात्रे, माजी प्रांत अध्यक्ष डॉ. अनिल कुलकर्णी आदींनी सर्वांचे अभिनंदन करून कार्यास शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.