ताज्या घडामोडी
सुभद्राबाई पंडितराव सावंत यांचे निधन

——-
पीएसआय भारत सावंत आणि डॉ. दीपक सावंत यांना मातृशोक
नांदेड, (प्रतिनिधी)- प्रभातनगर येथील ज्येष्ठ नागरिक सुभद्राबाई पंडितराव सावंत यांचे आज दुपारी १ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. उद्या दि. १८ जानेवारी सकाळी ११ वाजता नांदेड येथील गोवर्धनघाट स्मशानभूमीत दिवंगत सुभद्राबाई पंडितराव सावंत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत आणि उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दीपक सावंत यांच्या त्या मातोश्री होत. दिवंगत सुभद्राबाई सावंत यांच्या पश्चात पाच मुले, तीन मुली, सुना, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.