ताज्या घडामोडी

सकस साहित्य वाचनाने मानवी जीवन समृद्ध होते- प्रा.डॉ.भारत कचरे

प्रतिभा निकेतन महाविद्यालयात"वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२५" उपक्रम )

नांदेड : भाषिक कौशल्यातील वाचन कौशल्य हे अतिशय महत्त्वपूर्ण कौशल्य आहे,ज्यांना हे कौशल्य साध्य होते त्यांचा सर्वांगीण विकास होतो इतकेच नाही तर सकस वाचनाने मानवी जीवन समृद्ध होते, असे प्रतिपादन के.आर.एम. महिला महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा.डॉ.भारत कचरे यांनी केले.
प्रतिभा निकेतन महाविद्यालय,नांदेडच्या ग्रंथालय विभाग व मराठी विभागाच्या वतीने आयोजित “वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२५” या उपक्रमांतर्गत “वाचन कौशल्य कार्यशाळा” घेण्यात आली.ज्यामध्ये “पुस्तक परीक्षण व कथाकथन” या
उपविषयावर प्रमुख व्यक्ते म्हणून डॉ.भारत कचरे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी भाषा व साहित्य संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. संजय हापगुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ.भारत कचरे यांनी आदर्श पुस्तक परीक्षण कसे करावे, याविषयीचे महत्त्वपूर्ण चिंतन विद्यार्थ्यांसमोर ठेवून मोलाची माहिती दिली. तसेच एक उदाहरण म्हणून मराठी दलित साहित्य प्रवाहातील महत्त्वपूर्ण लेखक प्र.ई.सोनकांबळे यांचे पहिले दलित आत्मकथन ‘आठवणीचे पक्षी’यातील त्यांच्या निवडक आठवणी सांगताना त्यांनी ‘आठवणीचे पक्षी’मधून पोटतिडकीने वेदनेचे दाह उलगडत जाताना कुठेच रागाचा उद्रेक दिसत नाही आणि वाचताना वाचकालाही कंटाळा येत नाही. आठवणीचे पक्षी म्हणजे दुःख, दैन्य, दास्य व वेदनांचे आतील बाहेर व्यक्त होणे होय’ असे मत व्यक्त केले.
दि. ०१ जानेवारी २०२५ पासून “वाचन संकल्प महाराष्ट्राचा”हा उपक्रम महाविद्यालयात चालू असून दिनांक ०८ जानेवारी रोजी महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या ग्रंथ प्रदर्शनात मराठी, हिंदी व इंग्रजीतील ख्यातकीर्त साहित्यिकांच्या साहित्यकृती,राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुप्रसिद्ध लेखक, उद्योजक, खेळाडू, कलावंत, समाजसुधारक,थोर राजकीय व्यक्तिमत्वे यांची चरित्रे,आत्मचरित्रे ठेवण्यात आली होती.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या ग्रंथ प्रदर्शनास मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती.
दिनांक ०९ जानेवारी रोजी “पुस्तक परीक्षण व कथाकथन” हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात कु.अलका चौरे या एम.ए. मराठीच्या विद्यार्थिनीने डॉ. यशवंत मनोहर यांच्या ‘रमाई’या कादंबरीच्या पुस्तक परीक्षणाचे वाचन केले, तर बी.एस्सी.द्वितीय वर्षाची कु.नेहा संजय हापगुंडे हिने व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘झेल्या’ या कथेचे अभि वाचन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. रवींद्र लाठकर यांनी केले.प्रास्ताविकातून त्यांनी ‘वाचन संकल्प’ या उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली.
याप्रसंगी डॉ. दीपक वाघमारे,डॉ.जी.टी. वाघमारे,प्रा.डाॅ.जयश्री देशमुख,प्रा.डाॅ. ममता मालविया,प्रा.डाॅ. स्वाती तांडे,प्रा.डाॅ. वैशाली गोस्वामी,प्रा.नंदकिशोर गायकवाड, प्रा.डाॅ. जीवन चव्हाण, प्रा.डाॅ.बाबू गिरी,प्रा.डॉ. श्रीकांत केंद्रे,प्रा.डॉ. प्रवीणकुमार सावंत, प्रा.डॉ.राजेश्वर कुंटूरकर, प्रा.डॉ.राजेश चालीकवार,प्रा.प्रवीण स्वामी, प्रा.रवी चव्हाण, प्रा.डॉ.चंद्रकांत गजभारे, प्रा.मिर्झा तनवीर,प्रा.मिनहाज अर्शिया याबरोबरच विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.व्ही.डी.जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संतोष हापगुंडे यांनी केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.