दिव्यांगाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा,:संजय ससाणे (शिक्षणाधिकारी )

Correspondent / Anil chavan
mcr.news/manawat
————————————————
भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट व सक्षम संस्था देवगिरी प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९- डिसेंबर रविवार रोजी राष्ट्रीय दिव्यांग शक्ती करण दिना निमित्त दिव्यांगांकरिता मोफत तपासणी शिबिराचे आयोजन दर्डाज ग्लोबल पब्लिक स्कूल गंगाखेड येथे करण्यात आलेले होते
यावेळी शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री संजयजी ससाने यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गंगाखेड चे श्री नारायण ठूले सर श्री डॉ. सुभाष कदम , उपस्थित होते रुग्णांची तपासणी परभणीचे मनोविकार तज्ञ डॉ.जगदीश नाईक व मेंदू विकार तज्ञ डॉ. अजय चव्हाण यांनी केले याप्रसंगी सक्षम देवगिरी प्रांताचे कार्यवाहक डॉ. भगवान देशमुख सर, राकेश मेहता, व बोरांडे , एम. आय.पी.कॉलेज चे भौतिक उपचार तज्ञ यांची टीम यांनी रुग्णांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले या शिबिरात ४०रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत एक महिन्यासाठी लागणारे औषध वितरित करण्यात आले व भौतिक उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी कांकरिया ट्रस्टच्या सचिव सौ.मंजूताई दर्डा यांनी हे शिबिर घेण्यामागील उद्देश्य व संस्थेच्या कार्याबद्दल प्रास्ताविकात माहिती दिली यानंतर सुद्धा या रुग्णांना योग्य उपचार करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे नियोजन करण्यात येईल असे सक्षम संस्थेच्या वतीने आश्वासन देण्यात आले . यावेळी डॉ.सुभाष कदम यानी कांकरिया ट्रस्ट बद्दल वि सक्षमची माहिती देत मनोगत मांडले सर्व मान्यवरांचे आभार घनशामजी मालपाणी यानी मानले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी कांकरिया ट्रस्टच्या कोषाध्यक्ष सौ.मंगलताई अच्छा ,पूजाताई दर्डा, सिद्धार्थ दर्डा ,ऋषभ दर्डा ,शुभम अच्छा ,अमर करंडे ,शुभम जामगे, पोटभरे , यांचे यावेळी महत्वपूर्ण सहकार्य लाभले.
*