ताज्या घडामोडी
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन”

प्रतिनिधी:
भारताचे माजी पंतप्रधान थोर अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री 9:30 वाजता. दिल्ली येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. भारतात सात दिवसांचा दुखटा पाळला जाईल.
“प्रकृती बिघडल्याने गुरुवारी रात्री 9:30 वाजता एम्स मध्ये दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान ९वाजून५१ मि. त्याची प्राणज्योत मालवली. काही वर्षापासून ते प्रकृतीच्या तक्रारीमुळे त्रस्त होते.
प्रमुख वर्तमान पत्रानीही, मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या बातम्या छापल्या त्यात सकाळ वृत्तपत्राने अर्थपुरुष निवर्तला, लोकमत आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन-अर्थऋषी कलवश अशी हेडलाईन घेतली आहे. दैनिक भास्कर या वृत्तपत्राले “देश का मन मोन” अशी हेडलाईन त्याती घेतली आहे.