मनोज चव्हाण यांनी मानवत शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्विकारला.
अखेर मानवत तालुक्याला कायम गटशिक्षणाधिकारी मिळाले शिक्षणप्रेमी नागरिकांतून आनंद

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्याला शिक्षणाची ज्ञान गंगा आणून देणारे अधूनिक भगीरथ समजले जाणारे गटशिक्षणाधिकारी श्री संजय ससाने यांची सन 2021 मध्ये बदली झाली तेव्हा पासून गटशिक्षणाधिकारी हे पद नेहमीच डळमळत राहिले, त्यामूळे प्रभारी पद स्विकारून अनेक शैक्षणिक कामे प्रभारी यांच्या कार्यकाळात झाली पण अनेक दिवस हे पद रिक्त होते व त्या पदाला नेहमी प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्राप्त झाले होते .परंतु परीक्षा विधीन कालावधी पूर्ण करून नूतन गटशिक्षणाधिकारी श्री मनोज ताराचंद चव्हाण यांनी नूकताच मानवत तालुका गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्विकारला ते दिनांक 24 मे 2024 रोजी रुजू झाले आहेत. त्याबद्दल गट साधन केंद्र मानवत येथील श्री आत्माराम पाटील, श्री, गजानन वांबुरकर सर तसेच मानवत तालुका शिक्षक वृंद यांच्या वतीने श्री शशिकांत नेवरेकर, श्री, मोहम्मद लईक सर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी गट साधन केंद्रातील कर्मचारी श्री बालाजी कवडे , सुजाता वाघमारे , संतोष पांचाळ , विनोद इंगोले , प्रतोद बोरीकर , राजकुमार गाडे , डिगांबर गिरी , विलास राठोड , दत्ता शाहाने ,ज्ञानेश्वर जलसिगेआदींची या वेळी उपस्थिती होती. कायम शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्विकारल्याने मानवत तालूक्याती शिक्षणप्रेमी नागरिकांतून आनंद व्यक्त केल्या जात आहे. शिक्षण विभागातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील अशी आशा व्यक्त शिक्षणप्रेमी नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहे.
***