कोथाळा , कोल्हा, राजुरा रस्ता मंजुरी भाजपमुळेच राष्ट्रिय काॅग्रेसचा श्रेय लाटण्याचा केवीलवाणा प्रयत्न: डॉ. उमेश देशमुख*
मानवत / प्रतिनिधी
मानवत तालुक्यातील कोथाळा कोल्हा ते राजुरा या मंजूर सिमेंट रस्ता कामासह अन्य १३ रस्तकामे व पूल बांधण्याची मंजुरी भाजपच्या सततच्या पाठपुराव्याने डिसेंबर २२ मध्येच मिळाली असून काँग्रेस श्रेय लाटायचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस उद्घाटन करीत असलेल्या ५ ऑगस्ट च्या आधीच या रस्ताकामाचे उदघाटन भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सोमवारी ता २९ भाजपचे प्रदेश प्रवक्ते डॉ उमेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली . –
शहरातील भाजपच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस अनंत गोलाईत तालूका अध्यक्ष मगर यांच्या सह पदाधिकारी भाजपाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते .
सविस्तर वृत्त असे की,
मानवत तालूका भारतीय जनता पार्टीच्या कार्यालया मध्ये घेण्यात आलेल्या नामवंत वर्तमानपत्रांच्या पत्रकारांच्या पत्रकार परिषदे मध्ये भाजपाचे प्रदेश प्रवक्ते डाॅ. उमेद देशमूख हे बोलत होते.
मानवत तालूक्यातील कोल्हा ते राजूरा व कोथळा या रस्त्यांचे उदघाटन करण्याची लगीन घाई काॅग्रेसने चालविली असून सदरील रस्ता हा भाजपाच्या ओबीसी सेलचे प्राचार्य अनंत गोलाईत यांनी मा. गिरिषजी महाजन साहेबाकडे वेळो वेळी पाठपूरावा करून मंजूर करून घेतला असून जिल्हातील राष्ट्रीय काॅग्रेसने उदघाटनाची घोषणा करून श्रेय लाटण्याचा केवील वाणा प्रयत्न चालविला असल्याची खंत यावेळी देशमूख यांनी व्यक्त केली.
या वेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस प्राचार्य अनंत गोलाईत, प्राध्यापक शिवराज नाईक, तालूका अध्यक्ष मगर ,यांच्या सह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
**