गोविंद रामपूरीकर ने केले थेट जापानच्या जेनिफरशी शुभमंगल.
टोकियोतून येऊन आई-वडिलांनी केलं परभणीच्या रामपुरीत कन्यादान

मानवत / प्रतिनिधी.
———————————
90 च्या दशकातील बहुतेक जणांनी प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे वऱ्हाड निघाले लंडनला हे एक पत्री प्रयोगाचे नाटक ऐकले व पाहिले होते परंतु आता मात्र परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील गोविंद रामपुरीकर यांनी वऱ्हाड निघाले लंडनला याला फाटा देत वऱ्हाड आलंय टोकिओहून याची प्रचिती जिल्ह्याला दिली.
तालुक्यातील रामपुरी गावातील गोविंद रामपुरीकर या युवकाचे थेट जापानच्या जेनिफर या युवतीशी मनोमिलन सुत जुळले. त्यानंतर दोघात प्रेम झाले. जेनिफरला पण भारतीय संस्कृती विषयी आकर्षण होते. दोघांनी लग्न करण्याचा ठाम निर्णय घेतला. आणि जपानच्या टोकियो मधून थेट मराठवाड्यातील परभणीच्या रामपुरी हे गाव गाठले. सोबत जेनिफरचे आई-वडील देखील मुलीचे कन्यादान करण्यासाठी आले. आणि मोठ्या थाटामाटात परभणीच्या रामपुरी बु, गावात हा लग्न सोहळा संपन्न झाला.
मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रामपुरी (बु ) गावचा गोविंद पहिली ते आठवी पर्यंत गावातील जिल्हा परिषदेच्या प्रशाळेतच शिकला. नववी व दहावीचे शिक्षण लातूर जिल्ह्यात मावलगाव तालूका अहमदपूर येथे घेतले. त्यानंतर अकरावी व बारावी सायन्स त्याने परभणीतील भारत – भारती कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. पुढे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून 2016 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन्स या विषयात पदवी संपादित केली.
त्यानंतर पुणे येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी मध्ये 2 वर्षे जॉब केला, दरम्यान टाटा कंपनीने त्याला एका प्रोजेक्टसाठी जपान देशात पाठवले. जपान मधील टोकियो शहरात कंपनीत काम करत असताना त्याच भागात कॉर्पोरेशन लोकल बॉडी मध्ये गव्हर्नमेंट ऑफिसर असलेल्या राधिका सोबत कामा निमित्ताने ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसांनी गोविंदने जपान मधील दुसरी कंपनी जॉईन केली. राधिकाला भारतीय संस्कृती बद्दल विशेष आकर्षण असल्याने अधून मधून त्या विषयावर चर्चा व्हायची. दोघांनी लग्न करायचं ठरवलं आणि आप आपल्या कुटुंबियांना निर्णय कळवला. राधिकाचे वडील नोकरीतून रिटायर झालेले असून आई अजून ही नौकरी करते. वडिलांनी मुलीच्या निर्णयास होकार दिला मात्र आईला जावई बाहेर देशातला असल्याने सुरुवातीला मुलीची काळजी वाटली आणि तिची संमती मिळायला जवळपास एक वर्ष लागलं. अखेर दोन्ही बाजूनं होकार मिळताच जपान मध्येच लग्न करायचं आणि कुटुंबीयांसह जवळच्या नातेवाईकांना तिकडं बोलवायचं असा विचार गोविंदनं मांडला. मात्र त्याच्या वडिलांच्या इच्छेनुसार रामपुरी (बु ) येथेच स्वखर्चानं व भारतीय पद्धतीनं लग्न करण्याचं ठरलं. गोविंदचे वडील गावाकडे शेती करतात. त्यांना कोरडवाहू जमीन असून दोन मुलं, दोन विवाहित मुली आहेत. शेती विकून त्यांना मुलीची लग्नं करावी लागली. लहान मुलगा गोविंद याने मोठ्या कष्टानं शिक्षण घेऊन मोठ्या पदावर विदेशात तो खासगी कंपनीत नोकरीला आहे
शनिवार दिनांक 10 मे रोजी दुपारी 12.30 वाजता या शुभ मूहूर्तावर रामपुरी येथील श्री दत्त मंदिरात गोविंद व राधिका यांचा ( शुभमंगल ) विवाह सोहळा थाटात पार पडला.
यावेळी जवळपास 2 हजार वर्हाडी मंडळीसह आप्तगण लोक उपस्थित होते.
एवढे लोक पाहून राधिकाच्या आई – वडीलांना आश्चर्य वाटलं. कारण त्यांच्याकडं कोणत्या ही कार्यक्रमाला मोजकी माणसं येतात.
भारतात ग्रामीण भागात छोटी गावं म्हणजे एक कुटुंबच असतं, असं त्यांना सांगण्यात आलं. साता समुद्रापार जन्म झाला असला तरी आता जन्मो जन्मी एकत्र राहायचं हे वचन गोविंद आणि राधिकानं एकमेकांना दिलं आहे. दोघांच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाचा बार अगदी दणक्यात उडवून दिला.
चौकट..
पाहुणचाराने जपानी कुटुंब भारावले
राधिका लग्नापूर्वी आठ दिवस आधीच आई – वडिलां सोबत भारतात आली होती. भारतातील ताज महल व इतर पर्यटन स्थळांना भेटी देऊन ते रामपुरी येथे पोहोचले. त्या नंतर हळदी च्या कार्यक्रमाचा त्यांनी आनंद घेतला. हिंदू संस्कृतीतील रितीरिवाज व धार्मिक विधी जाणून घेत मराठ मोळ्या मंडळीचा खास पाहुणचार घेतला. लग्ना नंतर वरा सह नववधू, तिचे आई, वडील हे नांदेडहून बंगळूर मार्गे जपानला रवाना झाले.
**