ताज्या घडामोडी

हत्तलवाडी येथे दहा दिवशीय श्रामणेर शिबीर संपन्न .

मानवत / प्रतिनिधी.

——————————————
मानवत तालूक्यातील मौजे हत्तवाडी येथे दिनांक 6 मे ते15 मे असे दहा दिवशीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबीर हातलवाडी येथे मोठ्या उत्साहात व शांततेत संपन्न झाले .
या शिबीरात पूर्णा तालूका, परभणी तालूका, सेलु तालूका व मानवत तालुक्यातील यूवकांनी सहभाग घेऊन धम्म सेवा करण्याची जबाबदारी स्वीकारली या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेचे परभणी जिल्हा अध्यक्ष अशोक तुकाराम कांबळे , जिल्हा उपाध्यक्ष संस्कार के .वाय .दवंडे सर , केंद्रीय शिक्षक झोडपे सर , कार्यालयीन सचिव नागसेन हत्तीआंबीरे , वंचीत बहूजन आघाडी माजी जिल्हा अध्यक्ष धम्मपाल सोनटक्के उपस्थीत होते . कार्यक्रमाची सांगता पूज्यनिय भन्ते पी. धम्मानंद चैत्य भूमी मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले . या शिबीरास हत्तलवाडी येथील बौद्ध ऊपासक उपसिका व तरुण मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले. यावेळी ऊपासिका माधवी माणीक तूपसमुंदर व ऊपासिका अर्चना विष्णु डाके यांनी जेवणाची व्यवस्था करून धम्म कार्यास हातभार लावला . या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा ग्रामीण शाखा हत्तलवाडी महिला अध्यक्षा लक्ष्मीबाई रमेश तूपसमुंदर तसेच उपासक संतराम तूपसमुंदर, मनोहर तूपसमुंदर , दत्ताराव तूपसमुंदर , लिंबाजी धनले , ऊपसरपंच सतीष तूपसमुंदर , मिलिंद साळवे , बौद्धाचार्य नारायण तूपसमुंदर , माजी श्रामणेर ॲड मिलींद तूपसमुंदर यांचे सहकार्याने कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला .
या वेळी कार्यक्रमाचे नियोजन तालूका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा बालकिशन धबडगे , यांनी करुण . (उपाध्यक्ष )नरेंद्र कांबळे (सरचिटणीस ) रामेश्वर एडके , ( उपाध्यक्ष पर्यटन विभाग ) शंकरराव साळवे (तालूका संघटक ) महादेव सोनटके सर्वांच्या सहकार्यांने धम्मकार्य व्यवस्थीत व आनंदात संपन्न झाले .

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.