ताज्या घडामोडी
मानवत तालुक्यात वादळी वाऱ्याचा फटका , शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याची मागणी

मानवत // प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील खरबा शिवारात झालेल्या अचानक वादळी वाऱ्यामुळे शेतातील सौरपंपा चे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई व दुरुस्ती करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे,
मानवत तालुक्यातील खरबा शिवारातील कृष्णा शिवाजी निर्मळ यांच्या खरबा शिवारातील गट न,118 मधील शेतातील 5 मे रोजी अचानक झालेल्या चक्रीवादळामुळे सोलार पंपच्या प्लेट चे मोठे नुकसान झाले आहे, त्या मुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे,त्याच बरोबर केळी आंबा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे,त्या मुळे उडून गेल्याने सोर प्लेट ची पाहणी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची यावी अशी मागणी कृष्णा शिवाजी निर्मळ यांच्या कडून केली जात आहे.
**