https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी खास विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन: शिक्षणाधिकारी प्रा. गणेश शिंदे

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जिजाऊ माध्यमिक विद्यालयात उत्साही व आनंदी वातावरणात पार पडले यावेळी उद्घाटक म्हणून शिक्षणाधिकारी (प्रा.) प्रा. गणेश शिंदे हे बोलत होते या कार्यक्रमास जिजाऊ ज्ञानतीर्थ संस्थेचे अध्यक्ष रामराव लोहट, कोल्हा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप तांबे, मानवत सावरगाव केंद्राचे केंद्र प्रमुख शिरिष लोहट, मंगरूळ केंद्राचा केंद्र प्रमुख श्रीमती. माया जानराव, केकरजवळा केंद्राचे केंद्र प्रमुख कान्हू लहिरे, कोल्हा केंद्र प्रमुख प्रकाश मोहकरे यांची व्यासपीठावर उपस्थित होती. या विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटातून ४८ तर माध्यमिक गटातून १८ व शिक्षक गटातून ०५ स्पर्धाकांनी भाग घेतला तर स्पर्धेचे परीक्षण प्रा. रुपेश देशपांडे, प्रा. बालासाहेब होगे, प्रा. प्रल्हाद थोरात यांनी केले. विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटातुन उक्कलगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी कृष्णा पिंपळे प्रथम तर रॉयल क्लिप इंग्लिश स्कुलचा विद्यार्थी विराज ताटे द्वितीय, तर केकरजवळा येथील संत तुकाराम विद्यालयाचा विद्यार्थी सुरज लाडाने हा तृतीय आणि माध्यमिक गटातून मानवत रोड येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाचा विद्यार्थी गणेश भोंडवे प्रथम तर मंगरूळ येथील नृसिंह विद्यालयाचा विद्यार्थी संग्राम घुगे द्वितीय आणि शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालयाचा विद्यार्थी सुदर्शन रसाळ हा तृतीय तसेच प्राथमिक शिक्षकांतून कौशल पामे जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय मानवत, माध्यमिक शिक्षकातून भरत कुमार लाड प्रशाला रामपुरी व प्रयोगशाळा सहाय्यकातून प्रकाश हतागळे जिजाऊ ज्ञानतिर्थ विद्यालय मानवत रोड यांच्या शैक्षनिक साहित्यास प्रथम क्रमांक मिळाला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजू वाघ यांनी तर केले आभार प्रदर्शन पर्यवेक्षक अशोक दुधारे यांनी केले विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी तालुका समन्वयक बालाजी कवडे, विशेष शिक्षक ज्ञानेश्वर जलशिंगे, संतोष पांचाळ, सुजाता वाघमारे यांच्या सह जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयातील शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704