https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये उक्कलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा प्रथम क्रमांक

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये ७२ प्रयोगांची नोंद

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जिजाऊ ज्ञान शाळेत ०८ डिसेंबर रोजी संपन्न झाले.
आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उक्कलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी “वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करणे” हा प्रयोग सादर केला होता. या प्रयोगा मध्ये शाळेने सर्वप्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शना मध्ये एकूण ७२ प्रयोगांची नोंद झाली होती.
के. के. एम महा विद्यालयाचे श्री. रुपेश देशपांडे, श्री. बालासाहेब होगे, श्री. प्रल्हाद थोरात यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगाचे परीक्षण केले. मानवत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे प्रमूख जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच गटसाधन केंद्रातील विषय तज्ञ यांचे मोलाचे योगदान लाभले यावेळी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सर्वप्रथम क्रमांक उक्कलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगाव सर्व द्वितीय क्रमांक रॉयल क्लिप वर्ड स्कूल तर सर्व तृतीय क्रमांक संत तुकाराम विद्यालय यांनी पटकावला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगाव येथील प्रथम आलेल्या प्रयोगास शाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. अमोल तापकीर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून प्रयोगाचे सादरीकरण शाळेतील विद्यार्थी कृष्णा दिगंबर पिंपळे या विद्यार्थ्याने केले तर प्रयोग निर्मितीत शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. दत्तराव पिंपळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले मार्गदर्शक शिक्षक व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केंद्रप्रमुख श्री. शिरीष लोहट, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सिंधुताई धुराजीराव उक्कलकर, उपाध्यक्ष श्री. अंकुश भाऊ पिंपळे आणि शालेय व्यवस्थापण समिती सदस्य जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. मायादेवी गायकवाड यांच्या सह शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704