श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त हरित पंधरवडा उत्साहात संपन्न

नांदेड:( दि.२२ जुलै २०२४)
भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आधुनिक भगीरथ श्रद्धेय कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि ‘माझे महाविद्यालय, हरित महाविद्यालय’ या संकल्पनेनुसार व कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील यांच्या सहकार्याने दि. ७ जुलै ते २१ जुलै २०२४ दरम्यान हरित पंधरवडा उत्साहात संपन्न झाला.
या पंधरवड्यात २७ प्रजातींचे जवळपास एकूण पाचशे वृक्षांचे महाविद्यालयीन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सदरील वृक्षारोपण प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ. हरिश्चंद्र पतंगे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ. एल.व्ही.पदमाराणी राव, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्रीरंग बोडके, डॉ. एम.एम.व्ही. बेग, विविध विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वहस्ते उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण केले.
या योजनेच्या यशस्वीतेसाठी गार्डन अँड नेचर क्लब कमिटीचे समन्वयक डॉ.रमेश चिल्लावार, डॉ. सचिन पाटील, डॉ.सुरेश तेलंग, डॉ. साहेब शिंदे, डॉ.अंजली जाधव, डॉ.सविता वानखेडे, शिक्षकेतर कर्मचारी सौ.मनीषा बाचोटीकर,श्री विलास दुथाडे, श्री.प्रभू, श्री.वाघमारे, देविदास टर्के, अफसर अन्सारी यांनी परिश्रम घेतले तसेच प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.