ताज्या घडामोडी

अवघा रंग एक झाला, गणेश शिंदे यांचा भक्तीमय सरींचा आज कार्यक्रम

विठ्ठल पावडे यांच्या वतीने आषाढी महोत्सवाचे आयोजन

विठ्ठल पावडे यांच्या वतीने आषाढी महोत्सवाचे आयोजन

नांदेड (प्रतिनिधी) – आषाढी एकादशीचे औचित्य साधून नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या वतीने आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आसून, आज मंगळवार (ता.२२) रोजी सायंकाळी सहा वाजता, कुसूम सभागृह येथे संत साहित्याचे सुप्रसिद्ध युवा अभ्यासक गणेश शिंदे यांचा अवघा रंग एक झाला, या विशेष भक्तीमय सरींचा कार्यक्रम होणार आहे.

आषाढी एकादशी निमित्ताने जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी, आज मंगळवार (ता. २३ जुलै) रोजी सायंकाळी सहा वाजता कुसूम सभागृह येथे आषाढी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या दरम्यान संत साहित्याचे युवा अभ्यासक, युवा विचारवंत, गणेश शिंदे यांच्या अवघा रंग एक झाला, या भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खा. वसंतराव चव्हाण, आ. मोहनराव हंबर्डे, आ. माधवराव पाटील जवळगावर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार आदीसह आजी माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा व शहर कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष, पदाधिकारी, सेवा दल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, अनुसूचित जाती विभाग, अल्पसंख्याक विभाग, एनएसयुआय, सामाजिक न्याय विभाग आदीसह सर्व फ्रटंलचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. संत साहित्याचे अभ्यासक गणेश शिंदे यांच्या भक्तीमय, प्रबोधनमय विचारांच्या सरीत चिंब होण्यासाठी, अवघा रंग एक झाला या विशेष कार्यक्रमाचा नागरिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.