ताज्या घडामोडी

सौ, रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालयात विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी मोहिम संपन्न( CWS )

.

मानवत / प्रतिनिधी.
आज मानवत येथील सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालया मध्ये मानवत गटसाधन केंद्राच्या वतीने गट साधनकेंद्रातील तज्ञ श्री ज्ञानेश्वर ल.जलसिंगे यांनी सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालयाला भेट देऊन विद्यालयातील इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विशेष गरजा असलेल्या शालेय विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी करून पालकांना होणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संदर्भात खर्चाच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. जेणे करून पालकांना कोणत्याही बाबतीत खर्च होणार नाही तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या नोंदी घेतल्या. यावेळी तज्ञ जलसिंगे सरांचा विद्यालयाला दिलेल्या भेटीचे औचित्य साधून त्या निमित्ताने पुस्तक रुपी ग्रंथ भेट देऊन आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही. ओ. इंगोले, यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची यावेळी उपस्थित होते.

.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.