ताज्या घडामोडी

स्वाभिमानी* शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना धरले धारेवर

MCR .NEWS / MANAWAT
————————————————

मानवत पाळोदी रोडच्या कामात होत असलेल्या भ्रष्ट्राचाराचे बींग उघडे करण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाळोदी रोड वर रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी मानवत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.संदिप बोरकर साहेब यांनी मध्यस्थी करत मानवत तहसिलचे तहसीलदार यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, गजानन तुरे, नामदेव काळे, गोपाळ काळे, सावळी ग्राम पंचायतीचे सरपंच माणिकराव काळे, हत्तलवाडी ग्राम पंचायतीचे सरपंच कृष्णा शिंदे , मानोली ग्राम पंचायतीचे सरपंच लक्ष्मणराव शिंदे , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष विठ्ठल चोखट, दत्ता परांडे, महादेव काळे, विठ्ठल काळे, रंजित चव्हाण, किशनराव शिंदे, अशोक कदम, अशोक काळे, उद्धवराव काळे बाबा शिंदे, माणिक चौकट,‌बळीराम पतंगे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी , सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानवत तालूक्यातील मानवत ते पाळोदी रोडचे काम अत्यंत कासव गतीने व निकृष्ट दर्जाचे होत आहे. रोड साईड ने कुठे सहा इंच तर कुठे फुट भर खोद काम करून गिट्टी टाकत आहेत. गूत्तेदारांच्या मनमानी कारभार व वरिष्ठ अधिकारी यांचा अर्शिवाद असल्यामूळे या रोडच्या साईट पट्याच्या कामावर मुरूम नाही पाणी नाही रोलिंग सुद्धा केली जात नाही. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे गिट्टी पसरून त्यावर मोटर सायकल स्वार स्लीप होऊन अनेकांचे अपघात झाले आहेत. यावर अनेक तक्रारी आल्या तरी ठेकेदार यांना काहीच फरक पडत नव्हता म्हणून या भागातील काही गावातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे तक्रार केल्या तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलनाची घोषणा करताच कूंभकर्णी प्रशासनाला जाग आली आणि PWD चे इंजिनीयर यांनी तोंडी सांगितले की ठेकेदाराकडून व्यवस्थित काम करून घेतो व संघटनेने दिलेल्या सुचना त्यांना सांगून त्या पद्धतीने काम करून घेतो. बैठक संपल्यानंतर रोडचे इंजिनियर लोहेकर व संघटनेचे पदाधिकारी यांनी रोडच्या साईड पाहणी केली. आणि एक साईटचा रोड हा एका महिन्यात पुर्णपणे वाहतुकीस योग्य करुन देऊ . असा शब्द दिला. जर दिलेल्या कालावधीत एक साईटचा रोड वापरण्या योग्य नाही केला तर. या रोडचे काम बंद करण्याचा ईशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.