शेतात जाण्यासाठी गाडी रस्ता नसल्याने शेतकर्यांची हेळसांड रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी
करंजी येथील शेतकऱ्याची तहसीलदार, श्रीमती पल्लवी टेमकर यांच्याकडे मागणी

मानवत / प्रतिनिधी.
शेतात जाण्यासाठी गाडी रस्ता देण्यात यावा अशी मागणी करंजी येथील शेतकऱ्यांनी मानवत तहसिलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार, श्रीमती पल्लवी टेमकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिनांक २३ मार्च रोजी मागणी करण्यात आली.
तालूक्यातील करंजी येथील शेतकर्यांनी शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी एका निवेदनाद्बारे प्रशासनाकडे केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, मानवत तालुक्यातील मौ. करंजी येथील गट नं.१२६,१०२,१०१,१०३,१२८,१२३,१२४,१२७,१२२,१०९,११७, या गट क्रं. येथील शेतकऱ्यांना शेत शिवरात जाण्यासाठी गाडी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, गेल्या दोन वर्षा पासून रेल्वे ट्रॅक अंडर ब्रिज झाल्यामुळे शेतात जाण्यासाठी गाडी रास्ता बंद झाला आहे परिणामी शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्यासाठी येथील शेतकऱ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत संबंधित अधिकारी तसेच तहसील प्रशासन यांच्याकडे वेळो वेळी लेखी,तोंडी, तक्रार देऊन ही या विषयावर कोणताही तोडगा निघाला नाही तरी प्रशासनाने या बाबत लवकरात लवकर तोडगा काढून शेतकर्यांचा बैलगाडी रस्त्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावावा अन्यथा करंजी येथील शेतकऱ्यांच्या वतीने आपली बैल गाडी व जानावरे घेऊन उपोषण करावे लागेल असा इशारा ही यावेळी देण्यात आला असून निवेदनावर माजी लोक प्रतिनिधी गंगाधर पितळे, शिवाजी जाधव,दिलीप जाधव, कुमार जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, भाऊराव जाधव, राधाकिसन पितळे, अशोक जाधव, सुरेश खराबे, अनिल झाकणे, रामेश्वर जाधव, दत्ता जाधव, शिवराम जाधव, डीगांबर जाधव, बाळासाहेब जाधव, पुष्कर जाधव, अमर जाधव, पार्वती जाधव, मिरा शिंदे, अर्चना जाधव, रंजना जाधव, अंजना जाधव यांच्या सह शेतकऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.
****