https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांना “शिक्षण रत्न” पुरस्कार

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉ. उद्धवजी भोसले सर यांचा पाच वर्षाचा यशस्वी कार्यकाळ नुकताच पूर्ण झाला. आपल्या विचारांची व कर्तृत्वाची महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर छाप असलेले बहुआयामी, सर्वव्यापी, सर्वस्पर्शी असे महाराष्ट्राला लाभलेले वरदान म्हणजे मा. डॉ. उद्धवजी भोसले सर, त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व संशोधन क्षेत्रातील कर्तृत्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ओझोन फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचा शिक्षण रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ओझोन फाउंडेशन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत करण्यासाठी अतिशय प्रयत्नशील काम करत असून अशा कामामुळे संस्थेचे समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण झाले आहे गेल्या पाच वर्षापासून या फाउंडेशन मार्फत गौरव सोहळे होत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. डॉ. उद्धवजी भोसले यांना अध्यापनाचा अठ्ठावीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. तेरा वर्षे ते प्राचार्य होते. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यपीठाच्या कुलगुरु पदाची सूत्रे स्वीकारली आणि या विद्यापीठाचा चेहरा मोहरच बदलला. आपल्या पाच वर्षाच्या यशस्वी काळात कुलगुरु म्हणून डॉ. उद्धवजी भोसले यांनी विद्यापीठाला गतिमान प्रशासन देवून खऱ्या अर्थाने या विद्यापीठाला समृद्ध करण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांच्याच कुशल नेतृत्वात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे भारतातले एकमेव विद्यापीठ आहे की ज्याने कोरोना टेस्टिंगसाठी प्रयोगशाळा अल्पशा कालावधीत उभारून त्यास एमसीईआर व एनएबीएलची मान्यता देखिल मिळवली त्या मध्ये सुमारे ५ लक्ष रुग्णाचे स्वॅब तपासण्यात आले त्याबद्दल आम्ही सर्व ऋणी राहू अशी भावना संस्थेचे सचिव सुहास पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या पाच वर्षाच्या यशस्वी काळात कुलगुरु म्हणून डॉ. उद्धवजी भोसले यांनी विद्यापीठाला गतिमान प्रशासन देवून खऱ्या अर्थाने या विद्यापीठाला समृद्ध करण्याचे महान कार्य केले. सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत अव्याहत ५६० एकर परिसरात व्यापलेल्या विद्यापीठात ‘स्वच्छ विद्यापीठ आणि हरित विद्यापीठ’ या घोषवाक्याप्रमाणे कार्य चालू केले. दहा करोड लिटर पाणी क्षमतेचा पाणीसाठा तयार केला. विद्यार्थी, प्राध्यापक व वन विभाग यांच्या सहकार्याने एक लक्ष झाडांचे वृक्षारोपण केले त्यापैकी आज ९०% टक्के झाडे संगोपन व संवर्धन यामुळे मोठी होत आहेत. आपल्या कार्यकाळात संपूर्ण विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलला आहे. आर्थिक, शैक्षणिक आणि भौतिकदृष्ट्या विद्यापीठाची लक्षणीय प्रगती झाली आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. भविष्यात परत एकदा तुम्ही या विद्यापीठास कुलगुरू म्हणून लाभावेत, ही सदभावना सर्वांच्याच मनात आहे. कारण तुम्ही जिथे असाल तिथला परिसर आणि तिथली माणसं समृद्ध होत जातात यात तिळमात्र शंका नाही अशी भावना ओझोन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप काळे यांनी व्यक्त केली. या पुरस्कार वितरण प्रसंगी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक मा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव, ओझोन फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे सचिव मा. सुहास पाटील, अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप काळे, संस्थेचे सदस्य प्रा. बालाजी जाधव, डॉ. पांडुरंग पांचाळ, विद्यार्थी विकास मंडळ माजी सदस्य डॉ. शिवराज शिंदे, श्री. संभा कांबळे, श्री. अमोल हणमंते, श्री. जीवन बारसे, श्री. गोविंद सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704