https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत नगर परिषदेने केले लिपीकाच्या माध्यमातून आठवडी बाजारातील भाडे करूनां वाढीव भाडेपत्राचे फर्माण जाहिर.

मानवत नगर परिषदेच्या जिजिया करात वाढ. सामान्य भाढे धारकांमधून संताप.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत व्यापार पेठेत नगर परिषदेच्या सर्व नियमाचे पालन करून मोकळ्या जाग्यावर छोटे व्यावसायीकांनी आपले व्यवसाय थाटले आहे.
या संबंधीचा प्रशासनाकडे भाडे पट्टीच्या माध्यमातून ऊत्पन्नात वाढ व्हावी म्हणून नियमित भाडेपट्टी न.पा. प्रशासनाचे वसूली प्रतिनिधी यांच्याकडे जमा करून नगर परिषदेच्या ऊत्पनात भाडेपट्टीच्या माध्यमातून वसूली होऊन वाढ होत आहे. पण मानवत नगर परिषदेने एका जागे , जमीन भाडेवाढ ठराव घेऊन छोट्या व्यावसायीकांना हद् पार करण्याच्या ठरावा मूळे सामान्य हातावर पोटभरणारे व्यावसायीक भयभित झाले आहे.
मानवत नगर परिषद प्रशासकीय मंजूर ठराव दिनांक 21/03/2024 ठराव क्रमांक 263 अन्वये परोक्त विषयी आपणास या‌द्वारे कळविण्यात येते की मानवत नगर परिषदेने आपल्या हद्दी मध्ये नगर परिषदेने शहरातील छोटे व्यावसायीक यांच्यासाठी आपल्याला व्यवसया करीता मोकळी जागा तात्पुरत्या स्वरूपात किराया भाडेतत्त्वावर देण्यात आलेले आहे. वरील संदर्भीय नगर परिषद प्रशासकीय मंजूर ठराव अन्वये, मानवत नगर परिषदेने दिनांक 01/04/2024 पासून करारानुसार दिलेल्या मोकळ्या जागेचा दर (किराया भाडे) प्रति चौरस फूट प्रतिमाहा रु.25/- (अक्षरी पंचवीस रुपये) वाढ करण्यास मंजुरी मिळालेली आहे त्या अनुषंगाने आपणास दिलेली मोकळी जागा (-8 x 10–) 80 फूट म्हणजे अक्षरी (दोनहजार रुपये 2000 एक चौरस फूट 25 रूपये प्रमाणे प्रति महा भाडे. रु 2000 ) ऐवढे होत आहे तरी आपण जमीन किरायाचे जागा भाडे दि. 01/04/ 2024 पासून दरमहा मानवत नगर परिषद कार्यालयात भरणा करावे. असे फर्माण नगर परिषदेच्या वतीने बजावण्यात आले.
शहरात वरील प्रमाणे मोकळ्या जागे मध्ये केलेली दरवाढ आपणास मान्य नसल्यास आपण त्वरित सात दिवसात जागा रिकामी करून या बाबत लेखी स्वरूपात नगर परिषदेस अवगत करावे अन्यथा आपले या बाबत काही ही म्हणणे नाही असे ग्राह्य धरून केलेल्या मोकळ्या जागेची किराया भाडे दर वाढ, ही आपणास मंजूर आहे असे समजण्यात येईल. करीता सुचित. करण्यात येत असल्याचे मानवत नगर परिषदेच्या मूख्याधिकारी कोमल सावरे यांच्या सही निशी दिनांक 22/03/24 रोजी जाहिर झालेल्या फर्मान नगर परिषद कार्यालय मानवत कडून मा. श्री डी.बी. सातभाई लिपिक यांच्या या‌द्वारे आदेशित करण्यात येते कि, वरील प्रमाणे 01/04 2024 पासून जमीन किराया भाडेवाढ करण्यात आलेलेया दरवाढी प्रमाणे वसुली करण्यात यावी त्यामूळे मानवत शहरातील शेकडो मोकळ्या जागे भाडेकरून मधून ऐन निवडणूकीच्या काळात जागे भाडेवाड करणारा आदेशाची आमलबजावणी करण्याची ताकीद दिल्याने नागरीकांमधून भाडेवाढीच्या विरोधात नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.
*नगर परिषदे ने वाढिव भाडे पट्टीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.*

****

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704