https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘ कनिष्ठ महाविद्यालयाचे विविध क्रीडा प्रकारात सुयश

नांदेड:( दि.२५-१०-२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालयास नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका जिल्हास्तरीय विविध स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक यश मिळविले आहे.
कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, सेपाक टकरा या खेळात प्रथम, क्रिकेट व हॉकी यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे तसेच जलतरण, मलखांब, वुशु, वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन, व चेस या वैयक्तिक खेळामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
एकंदरीत जिल्हास्तरीय स्पर्धेत यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील १९ वर्षाखालील मुले व मुलीच्या संघाने भरघोस यश संपादन केले आहे.
लातूर विभागीय बुद्धिबळ स्पर्धा पोद्दार हायस्कूल येथे संपन्न झाली. यामध्ये यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाच्या निशांत नारायणराव बोकारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड देखील झाली.
लातूर विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धा नांदेड येथे संपन्न झाली. या ठिकाणी यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचा मोहन पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
या विविध स्पर्धांकरिता स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रा.उत्तम केंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सुयशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, क्रीडा संचालक डॉ.मनोज पैंजणे, प्रा.उत्तम केंद्रे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रा. ओमप्रकाश गुंजकर आणि डॉ.अजय गव्हाणे आदींनी अभिनंदन केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704