राजीव गांधी हायस्कूल मध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी संपन्न

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालूक्यातील ताडबोरगाव येथील राजीव गांधी हायस्कूल मध्ये दिनांक 01ऑगस्ट मंगळवार रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रम शालेय समितीचे अध्यक्ष *मा श्री इमरान अलिशाह खान साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक *मा नवघरे एस जी* यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली,
यावेळी वर्ग पाचवीतील विद्यार्थी पार्थ शेवाळे याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर आर्यन लोणसूने याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जिवन चरित्र्यावर आपले विचार व्यक्त केले.
या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स.शि क्षीरसागर बीबी यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार स.शि शेख महेमूद यांनी मानले.
यावेळी विद्यालयाचे सहशिक्षक लोखंडे आर जी, इटवाले जे बी, दुधाटे आर डी, मो इस्माईल, काटकर एस एन, सय्यद मुनीर, एल एम मुळे, जोगदंड बी एस तसेच जंगले डी एम, बॅग तारू लहाने लक्ष्मण यांच्या सह शालेय विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांची या वेळी उपस्थिती होती.
**