https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला “पर्यटन”. : लैलेशा भुरे

             पर्यटन…एक धावते विद्यापीठ
            ********************
पर्यटन म्हणजे प्रामुख्याने करमणूक आणि हेतूंसाठी प्रवास करणे.पर्यटन म्हटले की ते अनेक प्रकारचे असते.घरगुती पर्यटनात त्यांच्या देशातील रहिवासी त्यांच्या स्वतःच्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतात.जेव्हा दुसऱ्या देशातील रहिवासी आपल्या देशात येतात,त्याला अंतर्देशीय पर्यटन म्हटले जाते.जेव्हा आपल्या देशातील रहिवासी दुसऱ्या देशात जातात,त्याला परदेशी पर्यटन म्हटले जाते.पर्यटन करणे म्हणजे नुसतीच करमणूक नव्हे.विरंगुळा आणि मनोरंजनासोबत तो एक व्यवसाय देखील आहे.

पर्यटनामुळे आपल्याला नवीन संस्कृती शिकायला मिळते.नवीन लोकांना भेटायची आणि समजून घेण्याची संधी मिळते.
पर्यटनामुळे आपल्या देशाला परकीय चलन उत्पन्न करण्यास मदत होते.दरवर्षी भारतात येणारे पर्यटक भारतातील विविध ठिकाणांना भेटी देतात.ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात.तेथे राहतात आणि तिथल्या दुकानातील वस्तू खरेदी करतात.यातून परकीय मुद्रेचा साठा करण्यात मदत मिळते.पर्यटन हे सार्वजनिक आणि खाजगी उत्पन्नाचे स्त्रोत आहे.पर्यटन रोजगार निर्मितीमध्ये देखील मदत करतो.यामुळे हाॅटेल उद्योग,आतिथ्य उद्योग, सेवा क्षेत्र, करमणूक, परिवहन उद्योगात रोजगाराची संधी मिळते.पर्यटन हे धरणे,रस्ते, विमानतळ सुधारणे आणि पर्यटकांना एखाद्या ठिकाणी चांगल्या प्रकारे भेट देण्यास मदत करते.सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी पर्यटन हा एक उत्तम मार्ग आहे.नव्या लोकांशी भेटून पर्यटक एकमेकांना प्रेम, सहिष्णुता दर्शविण्यास शिकतो.त्यामुळे हे सामाजिक प्रगतीस प्रोत्साहित करते.कोणत्याही देशातून येणारे वेगवेगळे लोक त्यांच्यासह सुंदर आणि सांस्कृतिक संकल्पना घेऊन येतात आणि त्या संकल्पना वेगवेगळ्या ठिकाणी पोहचवतात.अशाप्रकारे स्थानिक कौशल्यता,भाषा,कलेला पर्यटनामुळे वाव मिळतो आणि संस्कृतीचा वारसा जपला जातो.पर्यटन देशात येणा-या पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतं.पर्यटन हा सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे.


हल्ली आपल्या भारतातील लोक फिरायला खूप बाहेर पडू लागले आहेत.त्यामुळे आपल्या देशात आणि परदेशातही पर्यटन उद्योगाचा चांगला विकास झाला आहे.
“केल्याने देशाटन, पंडितमैत्री सभेत, संचार, ग्रंथशास्त्र विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार”असे आपल्या मराठीत रामदास स्वामींनी म्हणून ठेवले आहे ते अगदी यथार्थच आहे.आपण कामानिमित्त, मनोरंजनानिमित्त किंवा अन्य सामाजिक कारणांनिमित्त प्रवास करीत असतो.प्रवासातील अनुभवांनी आपल्याला खूप काही शिकायला मिळते.प्रवासात आपल्याला नेहमीच सतर्क आणि सावध राहावे लागते.तसेच वेगवेगळ्या लोकांचे स्वभावही समजतात.चांगले, वाईट यातील फरकही समजतो.

आपण निसर्गाच्या जवळ जातो.आपले व्यक्तिमत्त्व सुधारते.वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आल्याने आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात.एकूणच प्रवास केल्यामुळे आपल्या अंगी व्यवहार चातुर्य येते यात काही शंका नाही.हल्ली लोकांना हौसेने पर्यटन करायला आवडते.शिवाय हल्ली पर्यटन कंपन्याही पुष्कळ निघालेल्या आहेत.विमाने,आगगाड्या,हाॅटेल्स अशा सर्व सोयीसुविधाही वाढल्या आहेत.ऑनलाईन बुकींगही करता येत असल्यामुळे लोक फिरायला बाहेर पडतात.अधिक प्रवास करणारी व्यक्ती अधिक माहितगार होते.विद्यार्थ्यांनी तर प्रवासाची प्रत्येक संधी घेतली पाहिजे.शाळांमध्येही शैक्षणिक सहली आयोजित केल्या जातात.किल्ले, लेण्या,जुनी ऐतिहासिक मंदिरे दाखवली जातात.त्यातून त्यांची बौद्धिक पातळी वाढते.शिवाय त्यांच्या स्मरणात केलेले पर्यटन कायम कोरले जाते.त्यांच्यात नवनव्या गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होते.पर्यटन केल्याने आपले आयुष्य भरभरून जगलो याचा आनंदही मिळतो.

अतिप्राचीन काळापासून प्रवास ही मनुष्यप्राण्याची सहज प्रवृत्ती आहे.प्राचीन काळी प्रवासाच्या पध्दती आणि संकल्पना यापेक्षा वेगळ्या होत्या.प्राचीन काळी प्रवासाचा उद्देश नवीन प्रदेशांचा शोध घेणे, व्यापार करणे तसेच धार्मिक स्थळांना भेट देणे हा होता.या प्रवासातूनच त्यांना विविध मानवी समूह, संस्कृती यांची परस्पर ओळख झाली.अनेक गोष्टींची देवाणघेवाण झाली.एकमेकांच्या समाज जीवनाचे आकलन झाले.प्रवास व पर्यटनाच्या वाढीसाठी या बाबी अनुकूल ठरल्या.घरातील सदस्यांच्या आवडी, निवडी आणि सवडीनुसार फिरायला कोठे,कधी आणि कसे जायचे ते ठरविले जाते.आपण सुट्टीत आपल्या आवडत्या ठिकाणी सहकुटुंब किंवा मित्रमैत्रिणींसोबत जाऊन मौज-मजा करून येतो आणि तजेल मनाने पुढील नेहमीची कामे सुरू करतो.पर्यटन हे राष्ट्रीय एकात्मता आणि आंतरराष्ट्रीय बंधुत्वाला प्रोत्साहन देते.पर्यटनामुळे देशाच्या विकासाला हातभार लागतो.
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704