https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

संभाषण कौशल्य यशाची गुरुकिल्ली – प्रा. डॉ. संदीप काळे

नांदेड:
संवाद कौशल्य हे कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये संवाद कौशल्य हा अविभाज्य घटक बनला आहे. विदयार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रमांबरोबर संवाद कौशल्ये आत्मसात केल्यास यशाचा मार्ग अधिक सुकर होईल असे मत प्रा. डॉ. संदीप काळे यांनी व्यक्त केले. श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचलित नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या संवाद व सादरीकरण कौशल्य या विषय़ावर आयोजित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मीर बशरत अली, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या डॉ. प्रतिमा बंडेवार, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. ज्योती सरकाळे यांची उपस्थिती होती. आपल्या भाषणामध्ये पुढे बोलत असताना त्यांनी
एकविसावे शतक हे अत्यंत स्पर्धात्मक व गुंतागुंतीचे झाले आहे असे सांगून या शतकामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यासक्रमाशिवायही अनेक बाबींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे हे विषद केले.
संभाषण कौशल्य म्हणजे आपला मुद्दा समोरच्या व्यक्तीला, श्रोत्यांना समजावुन सांगणे तसेच कौशल्याच्या बळावर कुठलीही व्यक्ती जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्धी मिळवू शकते वा प्रसंगी आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील सोडवू शकते. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता देखील एकप्रकारचे संभाषण कौशल्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तम संभाषण कौशल्य आत्मसात केले पाहिजे, ती एक काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. संदीप काळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. ज्योती सरकाळे यांनी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात, संभाषण कौशल्य, सादरीकरण कौशल्य, गट चर्चा, वक्तृत्व कौशल्य, स्वत्वाची जाणिव, मुलाखत तंत्र, सर्जनशीलता आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे असे सांगितले. डॉ. काळे यांनी आपल्या भाषणात पुढे बोलत असताना संवाद कौशल्यावरील प्रभुत्व चांगल्या करिअरच्या शोधात गेम चेंजर कसे ठरू शकते हे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की कुठलेही सादरीकरण करतांना अथवा एखादे व्याख्यान देताना प्रभावी संवाद कौशल्य अत्यंत महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनसहित अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704