https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नेट सेट पीएचडी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन

नांदेड:

महाराष्ट्रात उच्च शिक्षण क्षेत्रातील ढासळत चाललेली गुणवत्ता सुधारण्यासाठी व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाराष्ट्रात ( दर्जेदारपणे / परिणामकारक) लागू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (U.G.C.) आणि केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १००% प्राध्यापक पदभरती होणे गरजेचे आहे. उच्चशिक्षित नेट-सेट, पीएच.डी. पात्रता धारकांच्या रोजगाराशी निगडीत असणाऱ्या या मूलभूत प्रश्नाच्या निराकरणासाठी नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीने सत्याग्रह, उपोषणे, अन्नत्याग, धरणे, पदयात्रा इ. सर्व संवैधानिक तथा घटनात्मक मार्गाचा अवलंब केलेला आहे. उच्च विद्या प्राप्त असलेल्या लोकांना न्याय मिळून देण्यासाठी आपण वित्तमंत्री तसेच उच्च अधिकार समिती यांच्या उपस्थितीत नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीची तात्काळ बैठक घेऊन त्यांचा प्रलंबित मागण्या मान्य करून उच्चशिक्षितांना न्याय मिळवून घ्यावा ही विनंती.

प्रमुख मागण्याः

१. केंद्र शासन व UGC च्या निर्देशानुसार १००% प्राध्यापक (शारिरीक शिक्षण संचालक, ग्रंथपाल व शाळा सहायक सह) भरती करणे.
२. केंद्र शासन व UGC च्या निर्देशानुसार तासिका तत्त्व (CHB) धोरण बंद करुन ‘समान काम समान वेतन’ लागू करणे.
३. सुरू असलेली प्राध्यापक भरती गतिमान करून वेळेत पूर्ण करणे.
४. विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची नियुक्ती करणे.
५. दि. १७/१०/२०२२ व दि. २७/०३/२०२३ च्या तासिका तत्व धोरण शासन निर्णयांचे तंतोतंत पालन करणे.
. आदी प्रमुख मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले व आंदोलनाची पुढील दिशा सुद्धा जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदनाद्वारे सांगण्यात आली

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704