ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांनी शिवरायांचे व्यवस्थापन अभ्यासावे-डॉ.रामभाऊ मुटकुळे

नांदेड: विद्यार्थ्यांनी शिवरायांचे आगळे वेगळे व्यक्तिमत्व जाणण्यासाठी शिवरायांचे व्यवस्थापन अभ्यासावे असे प्रतिपादन बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमत नगर येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ.रामभाऊ मुटकुळे यांनी केले.
डॉ.रामभाऊ मुटकुळे शिवजयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्या वतीने आयोजित ‘आगळे वेगळे शिवराय’ या विशेष व्याख्यानात बोलत होते.
डॉ.रामभाऊ मुटकुळे यांनी शिवरायांच्या ज्ञात अज्ञात अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकताना त्यांचे जलनियोजन, कृषिधोरण,त्यांचे पर्यावरण विषयक विचार या सर्वांवर यथो चित प्रकाश टाकला. पुढे बोलताना त्यांनी हे ही सांगितले इस्राएल सारख्या देशांने शिवरायांचे जलव्यवस्थापन आणि गुप्तहेर यंत्रणा स्वीकारली हे ही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. राहुल वरवंटीकर यांनी केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर यांनी छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वातील विषयी विविध पैलूंवर प्रकाश टाकून डॉ. रामभाऊ मुटकुळे यांच्या विधानाला दुजोरा दिला. यावेळी मंचावर उप प्राचार्य डॉ. दिलीप स्वामी,राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. जयश्री देशमुख,नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील प्रा. डॉ. संतोष कोटूरवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागप्रमुख डॉ.स्वाती तांडे यांनी केले,तर आभार प्रदर्शन डॉ.जयश्री देशमुख यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी ग्रंथपाल डॉ.रवींद्र लाठकर डॉ. पी .निळकंठराव, डॉ. श्रीमंत राऊत, प्रा. डॉ.एस. व्ही.शिंदे, प्रा. डॉ. संजय हापगुंडे, प्रा. डॉ.एम.बी.लुटे.प्रा.व्ही. डी. जाधव,डॉ. बाबू गिरी डॉ.जीवन चव्हाण, डॉ.राजेश कुंटूरकर, डॉ.आनंद देशपांडे प्रा. संतोष हापगुंडे यांच्याबरोबरच बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.