https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राष्ट्र विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे अमूल्य योगदान… प्रा. डॉ. संदीप काळे*

नांदेड:

श्री शारदा भवन शैक्षणिक संस्था संचलित नांदेड फार्मसी कॉलेज व सहयोग सेवा भावी संस्था संचलित इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात ‘युवकांचा ध्यास – ग्राम शहर विकास’ या ब्रीदवाक्यानुसार आयोजित केलेल्या शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या वेळी मंचावर डॉ. एस. एस. पेकमवार प्रोफेसर स्कूल ऑफ फार्मसी यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती तसेच डॉ. एन. बी. घीवारे प्राचार्य, नांदेड फार्मसी कॉलेज, नांदेड, डॉ. एस. बी. धुत व नांदेड फार्मसी कॉलेज चे राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय गुंजकर व इंदिरा फार्मसी कॉलेज चे राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण एन. मुळी उपस्थितीत होते. या समारोप समारंभ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संदीप काळे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. संदीप काळे म्हणाले राष्ट्र विकासामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटते व आयुष्यामध्ये श्रमदानाचे महत्त्व कळते. त्याबरोबरच विद्यार्थी जीवनात निश्चित ध्येय असावे, बोलण्याची कला अवगत असावी, नाविन्याचा ध्यास असावा, स्वयंशिस्त असावी असा मौलिक सल्ला त्यांनी उपास्थित सर्व विद्यार्थ्यांना दिला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यानी फार्मसी क्षेत्रात कार्य करत असताना सेवा भाव महत्वाचा आहे असे सांगून या क्षेत्रात ज्ञानात सतत वाढ होत राहते, उच्च शिक्षणात करिअर संधी उपलब्ध आहेत, फार्मसी व्यावसायिकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे तसेच या क्षेत्रात करिअर स्थिरता असून मानवतेची सेवा व सामाजिक सहभाग असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी फार्मसी करिअर निवडावे असे आव्हान केले. पुढे बोलत असताना त्यांनी विद्यार्थ्यानी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, वेळेचे महत्व जोपासावे आणि कोणतेही कार्य करत असताना ते अगदी मन लावून केल्यास निश्चित यश मिळते असा सल्ला दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत असताना डॉ. एस. एस. पेकमवार प्रोफेसर स्कूल ऑफ फार्मसी यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यातील श्रमाचे महत्त्व सांगून स्वयंशिस्त ही अत्यंत महत्त्वाची असते, तसेच आपण आयुष्यातील बराच वेळ समाज माध्यमांवर घालत आहोत आजकाल सर्व विद्यार्थी दीड जीबी डाटा संपवण्यात व्यस्त आहेत. ही वेळ खूप अमूल्य असुन त्याचा सदुपयोग आपले आयुष्य उज्ज्वल होण्यासाठी द्यावा अशा मौलिक सूचना केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत सुरेख पद्धतीने इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी चे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रवीण मुळी यांनी केले तर आभार नांदेड फार्मसी कॉलेज चे कार्यक्रमाधिकारी डॉ. विजय गुंजकर यांनी केले. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनपैकी तीन विद्यार्थ्यांनी या सात दिवशीय शिबिरामधून आम्ही काय शिकलो यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704