https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

इटाळी जिल्हा परिषद शाळेत *ज्ञान ज्योती, सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. ईटाळी जिल्हा परिषद शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. *जिच्या हाती पाळ ण्याची दोरी ती जगाला उद्धारी* असे ठणकावून सांगणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती बाल सभेच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. हनुमंत नागरगोजे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. हरिकिशन काळे श्री.आत्माराम कोप्रटकर ग्रा. प. सदस्य तसेच गावातील शिक्षण प्रेमी श्री. नंदकुमार पाष्टे तसेच शालेय शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेमध्ये सहभागी झाल्या होत्या शाळेतील जेष्ठ शिक्षिका श्रीमती मिरा फावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा दिला कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना श्री. नारायण गोरे व शाळेचे मुख्याध्यापक श्री. हनुमंत नागरगोजे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना माहिती दिली ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ” या स्पर्धात्मक अभियानाची माहिती देत मुख्यमंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांना संदेश परिपत्रकाचे वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास शाळेतील शिक्षक तसेच विद्यार्थी आणि ईटाळी ग्रामस्थ यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704