मानवत येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात

मानवत / प्रतिनिधी.
मानवत शहरातील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात
पार पडला स्नेहसंमेलन म्हणजे कलाविष्कार, स्नेहसंमेलन म्हणजे सुप्त गुणांचे प्रदर्शन, स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ आनंद देणारा सोहळा सर्व विद्यार्थ्यांना शालेय जीवनात स्नेहसंमेलनाची एक वेगळीच ओढ आणि आवड असते याच अनुषंगाने मानवत येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे मा. आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकल्पनेतून तसेच प्रादेशिक उपायुक्त, मा. श्रीमती. सोनकवडे, समाज कल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रेरणेतून आणि परभणी जिल्ह्याच्या समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त मा. श्रीमती. गीता गुठ्ठे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मानवत येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे तसेच बालिका दिनाचे औचित्य साधून वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दर वर्षी प्रमाणेच या ही वर्षी वसतिगृहाच्या विद्यार्थिनींनी स्नेहसंमेलनात उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी , विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी शाळेत स्नेह संमेलनाचे आयोजन केल्या जाते. हीच कला सादर करण्याचे व्यासपीठ मा. आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या संकल्पनेतून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यक्रमा साठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा सहाय्यक शिक्षिका श्रीमती. कोकणे वस्ती गृहाच्या प्रभारी गृहपाल श्रीमती. एस. ए. रानभरे व उपस्थित माता – पिता पालक यांच्या हस्ते ज्ञानज्योती, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसतिगृहाच्या प्रभारी गृहपाल श्रीमती. एस. ए. रानभरे यांनी केले तर सूत्रसंचालन वसतिगृहाच्या विद्यार्थिनी कु. प्रियंका पंडित व कु. रंजना गित्ते यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. स्नेहा वाघमारे हिने केले. यावेळी कार्यक्रमास पालक व वस्ती गृहातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
****