लोकशाही चिरायू होवो डॉ. पी एस लांडगे.

मानवत / प्रतिनिधी.
सामंतशाही, राजेशाही, भांडवलशाही व हुकुमशाही यांचा त्याग, संघर्ष करुन आपण इतिहास घडवून आज आपल्या देशात लोकशाही पहावयास मिळत आहे. या साठी आपण खरोखर भाग्यवान आहोत. आपल्याला ती टिकून ठेवाची जबाबदारी आहे. त्यासाठी आपले मतदान फार महत्वाचे आहे. राष्ट्रीय सेवा योजना शिबीर आटोला या गावी घेण्यात आले.
या प्रसंगी संध्याकाळच्या बौद्धिक सत्रात बोलत होते.
या वेळी के. के. एम. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.श्री. संदीप राठोड, डॉ.श्री. योगेश बागुल, आटोळा गावच्या सरपंच राहीबाई नवघरे, तसेच रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.श्री. बी.एस.गीते आदी उपस्थित होते.
या वेळी डाॅ. पी.एस. लांडगे मार्गदर्शनात ते म्हणाले की सध्याची लोकशाही धोक्यात आली आहे. विविध राजकीय पक्ष व त्यांची भूमिका संधी साधू भूमिकेमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. मतदरांची खरेदी विक्री करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सध्या सर्वत्र सुरु आहे. त्यासाठी प्रत्येक युवकांचे व नागरीकांचे मत हे अमूल्य आहेत. ते विकू नका त्याचा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे. आपण मतदारराजा असून आपले मतदानाचे पवित्र कार्य हे महत्वाचे आहे .
असे या प्रसंगी पटवून दिले. आपली लोकशाही चिरायू होवो आणि त्यासाठी शुभेच्छा सर्व ग्राम वासियांना दिल्या .
*========================*