https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

महसूल सप्ताह *एक हात मदतीचा* कार्यक्रम संपन्न.

मानवत / प्रतिनिधी.

दिनांक 03/08/2023 रोजी मानवत तहसिल कार्यालय, मानवतच्या वतीने मानवत नगर परिषद सभागृह येथे महसूल सप्ताह उपक्रम अंतर्गत एक हात मदतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्य्क्ष स्थान पाथरी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री.शैलेश लाहोटी यांनी भुषविले. प्रमुख अतिथी म्हणून सोनपेठ तहसिल चे तहसिलदार श्री.सुनिल कावरखे, मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे आणि मानवत तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री.रनमाळे हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानवत तालुक्याक्याचे तहसिलदार श्रीमती पल्लवी टेमकर यांनी केले.
सदर कार्यक्रमाअंतर्गत तहसिल कार्यालय मानवत मार्फत देण्या‍त येणा-या विविध सेवा व योजनांचा लाभ लाभार्थांना देण्यागत आला. यामध्येे शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबांतील वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये मदतीचा लाभ देण्यात आला. अशा आठ लाभार्थांना लाभ देण्याात आला. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय योजनेअंतर्गत एकुण 09 लाभार्थांना लाभ देण्यात आला तसेच मतदान कार्ड लाभार्थी,राशन कार्ड लाभार्थी, संजय गांधी योजना लाभार्थी व 7/12 व फेरफार नक्कल अशा विविध लाभार्थांना लाभ देण्याात आला. तसेच नैसर्गिक आपत्ती अंतर्गत सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्यां शेतक-यांना अनुदान वाटप करण्यात आले. तसेच मयत जनावरांसाठी धनादेश व्दा्रे लाभ देण्यात आला.
मराठवाडा मुक्ती संग्राम स्वा‍तंत्र्य अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वा्तंत्र्य सैनिक यांच्या पत्नी वेणूबाई मधूकरराव जैन यांचा शाल श्रीफळ देउुन विशेष गौरव करण्यात आला. मानवत नगरपालिका मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी ध्या्न धारणाचे महत्व सांगुन ध्यावन धारणेचा छोटेखानी कार्यक्रम घेण्याात आला.
अध्यक्षीय भाषणात श्री.शैलेश लाहोटी साहेबांनी सर्व उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच ई पिक पाहणी आणि मतदार नोंदणी वाढविण्या च्या दृष्टीने उपस्थितांना आवाहन केले. तसेच तहसिल कार्यालय, मानवत निवडणूक शाखा मार्फत स्वीृप कार्यक्रमाचे अनुषंगाने मतदान केद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत घरोघरी सर्वेक्षण करणे चालु असल्या‍ची माहिती देण्या्त आली. सदर सर्वेक्षणासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. तसेच निवडणूक विभागाचा स्टॉल उभारुन मतदार नोंदणी संबंधित अर्ज स्वीकारण्यात आले. कार्यक्रमाचे शेवटी हर घर नर्सरी कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थाना वृक्ष रोपाचे वाटप करण्या्त आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.रणजितसिंह कोळेकर, अप्पर तहसिलदार मानवत तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.किशोर तुपसागर यांनी केले. सदर कार्यक्रम उत्कृष्ट रित्या पार पाडण्यासाठी श्री बापू रासवे,निवडणूक विभागाचे संगणक चालक राहुल खाडे,शरद दहे, सौरव खरात ,राम काळे,एकनाथ गायकवाड,ईश्वर भाकरे,अमीर अन्सारी,इत्यादींनी परिश्रम घेतले.
या वेळी रणजितसिंह साधु कोळेकर अप्पतर तहसिलदार मानवत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704