https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत तालूक्यातील शेतकर्‍यावर अस्माणी संकटाबरोबर सूलतांनी संकट

मानवत तालुक्यात २१ दिवसाचा पावसाचा खंड पडल्यामुळे पिक विमा देण्याच्या मागणी सह विविध मागण्या साठी मानवत तहसील कार्यालया समोर शेतकऱ्याचे मुंडण आंदोलन*

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यात गेल्या एका महिन्या पासून पावसाचा २१ दिवसाचा खंड पडला आहे. त्यामुळे सर्व पिके करपून गेली असून यामुळे शेतकऱ्याचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. तरी मानवत तालुक्यातील सर्व महसूल मंडळाचा पिक विमा अग्रीम वेतना मध्ये समावेश करावा तसेच गेल्या एका सध्याची परिस्थिती ही दुष्काळी परिस्थिती आहे.
त्यामुळे शासनाने पिकविण्याची अग्रिम २५ % रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी आदी मागण्यासाठी तालूक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने दिनांक २८ ऑगस्ट रोजी मानवत तहसील कार्यालया समोर शेतकऱ्यांनी आपले मुंडण करत व शासनाचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले तर एक ते दिड तास मानवत तहसिलदार यांच्या कार्यालया समोर ठिय्या मांडला होता. मानवत तालुका कृषी अधिकारी गणेश कोरेवाड व मानवत तहसिलच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर, विमा प्रतिनिधी यांच्याशी आंदोलन कर्त्यानी चर्चा केली चर्चे नंतर लवकरच यावर बैठक आयोजित करण्यात येईल व पिक विमा अग्रीम यापासून एक ही शेतकरी वंचित राहू दिल्या जाणार नाही असे अश्वासन यावेळी दिले आणि मागण्याचे निवेदन मानवत तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले.
याबाबत तोडगा लवकर न निघाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा ही यावेळी आंदोलन कर्त्या शेतकर्‍यांकडून देण्यात आला.
आंदोलनामध्ये गोविंद घांडगे, नामदेव काळे, लक्ष्मण शिंदे, सूरज काकडे,बाळासाहेब आळणे, दत्ताराव परांडे,दत्ता शिंदे, लिंबाजी कचरे, कृष्णा शिंदे,हनुमान मसालकर प्रकाश भोसले, राजेभाऊ होगे, अशोक काळे, दत्ता काळे, माधव शिंदे, शंकर मांडे, युवराज सुरवसे, नवनाथ निर्मळ, अजय शिंदे, संतोष नारके, ऋषी शिंदे, विशाल यादव, माऊली शिंदे, अमोल कदम, विठ्ठल काळे, प्रसाद काळे, भागवत होगे, आसाराम होगे, उमेश होगे, गोपाळ काळे, विठ्ठल काळे, यांच्या सह तालुक्यातील शेतकरी यावेळी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मुंडण आंदोलन व सरकारचा निषेध या दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपनिरीक्षक रमेश गिरी, किशोर गावंडे, अतुल पचांगे, विलास मोरे, नारायण घोरपडे यांच्या सह पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704